शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील गांजाप्रकरणात चार जणांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 22:44 IST

मध्यवर्ती कारागृहातील गांजा प्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी उपअधीक्षकांसह चौघांना नोटीस बजावून प्रकरणाविषयीची माहिती व दस्तऐवज मागविले आहे. कारागृह प्रशासनाकडूनही गांजा आढळल्याच्या प्रकरणात चौकशी केली असून तो अहवाल महानिरीक्षकांना पाठविला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देकारागृह प्रशासनाकडूनही चौकशी : बंद्यांचे बयाण नोंदविले
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मध्यवर्ती कारागृहातील गांजा प्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी उपअधीक्षकांसह चौघांना नोटीस बजावून प्रकरणाविषयीची माहिती व दस्तऐवज मागविले आहे. कारागृह प्रशासनाकडूनही गांजा आढळल्याच्या प्रकरणात चौकशी केली असून तो अहवाल महानिरीक्षकांना पाठविला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.अमरावती मध्यवर्ती कारागृहातील धान्य गोदामात चनाडाळीच्या पोत्यात गांज्याच्या पुड्या आढळल्या. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कडेकोट बंदोबस्त असताना कारागृहात गांजा पोहोचला कसा, यावर पोलीस खल करीत आहे. त्याअनुषंगाने फे्रजरपुरा पोलिसांनी कसून चौकशी करीत असून पोलिसांनी काही बंद्याचे बयाण नोंदविले आहे. पोलिसांनी धान्य पुरवठा करणारे व्यापारी मुतंजर अली मुज्जफर अली (रा.विद्यापीठ रोड), केळ व अंडे पुरवठा करणारा व्यापारी मो. फारूख मो. हन्नू (रा.अन्सारनगर) यांना नोटीस बजावून धान्य पुरवठ्याबाबतचे सर्व दस्ताऐवज मागविले आहे. सोबतच उपअधीक्षक गायकवाड यांनाही माहिती मागविली आहे. सोबतच त्यांचे रायटर तथा जेल रक्षक बेले व वाघडोळे यांना नोटीस बजावून माहिती मागविली आहे. धान्य, केळी व अंडा पुरवठादारस, उपअधीक्षक व रक्षक यांचे बयाण फ्रेजरपुरा पोलीस शनिवारी नोंदविणार होते.