शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

-तर आम्हीच नाही का पालकमंत्री झालो असतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 23:15 IST

लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केले. त्याचा वचपा काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी आमच्यावर जादुटोणा करण्यासाठीचे गुन्हे दाखल करविले. जादुटोणा खरा असता आणि आम्हाला तो करता आला असता तर आम्हीच नाही का पालकमंत्री झालो असतो, असा सवाल गुन्हे दाखल झालेल्या 'त्या' पाच महिलांनी आज पत्रपरिषदेत उपस्थित केला.

ठळक मुद्दे'त्या' महिलांचा पत्रपरिषदेत सवाल : प्रकरण पालकमंत्र्यांच्या घरावरील जादुटोण्याचे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन केले. त्याचा वचपा काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी आमच्यावर जादुटोणा करण्यासाठीचे गुन्हे दाखल करविले. जादुटोणा खरा असता आणि आम्हाला तो करता आला असता तर आम्हीच नाही का पालकमंत्री झालो असतो, असा सवाल गुन्हे दाखल झालेल्या 'त्या' पाच महिलांनी आज पत्रपरिषदेत उपस्थित केला.स्थानिक कल्याणनगर चौक ते दस्तुरनगर रस्त्याच्या श्रेयवादावारून पेटलेल्या भांडणातून पालकमंत्र्यांच्या घरासमोर चोळीबांगडी आणि बेशरमच्या झाडाचा अहेर ठेवण्याचे आंदोलन बडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांच्या समर्थक महिलांनी केले होते. सदर महिलांवर आंदोलनासाठीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर काही दिवसांनी त्याच महिलांवर अचानक जादुटोणा विरोधी कायद्यांतर्गतदेखील गुन्हे नोंदविण्यात आले. विशेष असे की त्या गुन्ह्यांसाठीची तक्रार पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे स्वीय सहायक अमोल काळे यांनी दिली.हा तर स्त्रियांचा अपमान!शासन जादुटोण्याविरुद्ध कायदा अंमलात आणते आणि भाजपचे आमच्या जिल्ह्यातील पालकमंत्री जादुटोण्यावर विश्वास ठेवतात, किती हा बालिशपणा. अशा व्यक्तीच्या हाती जिल्ह्याचे पालकत्त्व असावे, किती हे लाजिरवाणे, किती हे चिंताजनक, असे बोचरे सवाल त्यांनी उपस्थित केले. पालकमंत्र्यांनी स्त्रियांचा सन्मान करावा, खोटे गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बेशरमच्या झाडाप्रमाणे वागणाºया पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याविरुद्ध आम्हीही पोलिस तक्रार करू, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष व मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करू, असा इशारा त्या महिलांनी दिला. यावेळी संगीता काळपांडे, वंदना जामनेकर, मीरा कोलटेके, चंदा लांडे, कोमल मानापुरे या उपस्थित होत्या.१० कोटींचा मानहानी दावाही ठोकणारलोकशाही पद्धतीने समस्या मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांविरुद्ध धादांत खोटी तक्रार देण्यासाठी पदाचा दुरुपयोग करणे, पोलिस यंत्रणेचा गैरवापर करणे, महिलांचा अपमान करणे, यासाठी पालकमंत्र्यांवर गुन्हे न नोंदविल्यास १० कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल करू, असा इशारा 'त्या' महिलांनी दिला.