शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
5
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
6
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
8
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
9
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
10
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
11
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
12
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
13
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
14
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
15
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
16
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
17
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
18
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
19
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
20
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले

सीसीटीव्ही आहेच ना, मग गार्डची गरज काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:26 IST

स्टेट बँक आॅफ इंडियाच्या बहुतांश एटीएमवर सुरक्षा रक्षकच नाहीत. कोणीही केव्हाही मशीनशी छेडछाड करू शकतो.

ठळक मुद्देस्टेट बँक बेपर्वा : एटीएम सुरक्षा अद्यापही ऐरणीवर

आॅनलाईन लोकमतअमरावती : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या बहुतांश एटीएमवर सुरक्षा रक्षकच नाहीत. कोणीही केव्हाही मशीनशी छेडछाड करू शकतो. शहरात खात्यातून परस्पर पैसे उडविण्याची सर्वाधिक प्रकरणे स्टेट बँकेशी संबंधित आहेत. मात्र सीसीटीव्ही आहे; मग माणूस ठेवायचा कशाला, अशी बेपर्वा उत्तरे स्टेट बँकेचे अधिकारी देत आहेत. यामुळे एटीएमच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.शहरातील बँक खात्यातून परस्पर रक्कम लंपास जात असल्याच्या धक्कादायक घटना एका पाठोपाठ घडल्या. बँकांची विश्वासार्हता धोक्यात येण्याची चिन्हे होती. अखेर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनीच शहरातील बॅक अधिकाºयांची बैठक बोलावली. तरीदेखील बहुतांश एटीएमवर गर्दी व सुरक्षा रक्षकच नसल्यामुळे आणखी सायबर गुन्हेगार सक्रिय होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. या भोंगळ कारभाराचा फायदा घेऊन आंतरराष्ट्रीय टोळीने शहरातील तब्बल २० बँक खात्यांतून तब्बल २४ लाखांपर्यंतची रोख चोरली. दोन महिन्यानंतर पोलिसांना दिल्लीतील या टोळीचा सुगावा लागला. त्यांना जेरबंद करण्यासाठी पोलीस खात्याने खर्च केला. मात्र, एटीएमची सुरक्षा वाºयावर असल्यामुळे पोलिसांच्या परिश्रमाचे फलित काय, असा प्रश्न पुन्हा निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत आहे.सीपींच्या सूचनांचे पालन केव्हा?एटीएमच्या सुरक्षेविषयी पोलीस आयुक्तांनी सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांना एकत्रित बोलावून बैठक घेतली होती. एटीएमवर २४ तास सुरक्षा रक्षक नेमा, एकच व्यक्ती प्रवेश करू शकेल अशी व्यवस्था करा, सीसीटीव्ही कॅमेºयांची पडताळणी करा, सीसीटीव्ही कॅमेºयात पैसे काढणाºयांचे चेहेरे स्पष्ट दिसावेत, बँक अधिकारी व कर्मचाºयांनी वेळोवेळी एटीएमवर जाऊन सीसीटीव्ही व मशीनची पाहणी करावी आदी सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. मात्र, शहरातील स्टेट बँकेच्या बहुतांश एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नाहीत, एटीएमच्या आत गर्दी दिसून येते.सीसीटीव्ही आहेत. यामुळे माणूस ठेवावा लागत नाही. हा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला आहे. पोलिसांच्या सूचना व मागणीचा प्रस्ताव पुनर्विचाराकरिता वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे. मान्यता मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.- अश्विन चौधरी,क्षेत्रीय प्रबंधक