शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

सक्तीची नव्हे, गरज स्वयंशासनाची !

By admin | Updated: February 6, 2016 00:12 IST

शेवटी डोके तुमचे आहे. हेल्मेट तुमच्या डोक्यावरंच राहावे, हेल्मेटची रक्कम शासनदरबारी जमा होत नाही.

प्रदीप भाकरे अमरावतीशेवटी डोके तुमचे आहे. हेल्मेट तुमच्या डोक्यावरंच राहावे, हेल्मेटची रक्कम शासनदरबारी जमा होत नाही. त्यामुळे हेल्मेट सक्तीची नव्हे, तर स्वयंशासनाची विषयवस्तू असल्याची सांघिक प्रतिक्रिया उमटली आहे. औरंगाबाद, पुण्यानंतर संपूर्ण राज्यात हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. परंतु ही सक्ती नसून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आहे, अशी प्रतिक्रिया परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिल्याने हेल्मेट सक्तीचा मुद्दा प्रकाशात आला. औरंगाबादेत फेब्रुवारीपासून हेल्मेटसक्ती केली. त्यापूर्वी तेथे हेल्मेटसक्तीबाबत जनजागृती करण्यात आली. अमरावतीमध्ये हेल्मेटसक्ती कशी हाताळली जाते, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. निर्णय हेल्मेट सक्तीचा : जनजागृती आवश्यक अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यात सर्वदूर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यात अनेकांना जीव गमवावा लागला. तर हजारोंना कायमचे जायबंदी व्हावे लागले. हेल्मेट असते तर त्यांचा जीव वाचू शकला असता. डोक्याला गंभीर इजा झाल्यानेही काही जण आयुष्याची लढाई लढत आहेत. हेल्मेट असल्यास अशा अपघातांना आळा बसतो. जीव वाचविण्यास हेल्मेट आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाला मोठ्या आघातापासून वाचविण्यासाठी हेल्मेट नैतिक जबाबदारी म्हणून स्वीकारण्याची वेळ आली आहे. सक्तीने प्रश्न सुटणार नाही नैतिक जबाबदारी जीवित हानी टाळण्यास हेल्मेटमुळे मदत होते. म्हणून राज्यभरात हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची अंमलबजाणी होणार आहे. शिवाय ती नैतिक जबाबदारी असल्याची जाणीव नागरिकांना करून द्यावी लागेल. हेल्मेट वापरण्याकडे सक्ती नव्हे, तर नैतिक जबाबदारी म्हणून पाहण्याची गरज आहे. हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती महत्त्वाचे आहे. नागरिकांना सक्तीपेक्षा नैतिक जबाबदारी असल्याची जाणीव करून देणे आवश्यक असताना त्यात आधी पोलिसांनीही हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. अपघाताचे प्रचंड प्रमाण पाहता हेल्मेट सक्तीचा निर्णय स्तुत्य आहे. मात्र सक्ती करुन होणार नाही. हेल्मेट ही नैतिक जबाबदारी म्हणून अंगिकारणे महत्त्वाचे आहे. - विजय काठोळे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे लागेल. त्यासाठी आधी जनजागृतीही तेवढीच आवश्यक आहे. हेल्मेट उपलब्धतेचाही विचार करावा लागेल. - दत्तात्रेय मंडलिक,पोलीस आयुक्त, अमरावती.