शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

काँग्रेस पक्ष नव्हे, चळवळ !

By admin | Updated: February 27, 2016 00:01 IST

काँग्रेस हा केवळ पक्ष नसून चळवळ आहे आणि धर्मनिरपेक्षता हा केंद्रबिंदू आहे. पक्षासाठी शेतकऱ्यांचे हित जोपासणे हा मुद्दाच महत्त्वपूर्ण आहे.

यशोमती ठाकूर : मतभेदापेक्षा मनभेद असू नये, दोनद येथे कार्यकर्ता मेळावाअमरावती : काँग्रेस हा केवळ पक्ष नसून चळवळ आहे आणि धर्मनिरपेक्षता हा केंद्रबिंदू आहे. पक्षासाठी शेतकऱ्यांचे हित जोपासणे हा मुद्दाच महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे व सर्व सामान्य जनतेच्या हिताचे सरकार स्थापित होणे आवश्यक आहे. तसेच या चळवळीत काम करीत असताना मतभेद झाले तरी मनभेद असू नये, असे प्रतिपादन आ. यशोमती ठाकूर यांनी केले. दोनद, अमरावती येथे गुरुवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी आमदार भैयासाहेब ठाकूर हे होते. आ. यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या, पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला. मात्र विदर्भ प्रदेश विकासापासून वंचित असल्याची भावना वेळोवेळी व्यक्त होते. पण त्या भागातील जनता विकासाभिमुख नेतृत्वाला नेहमीच बळ देते. याउलट विदर्भात एकमेकांचे पाय ओढण्यात आपण धन्यता मानतो. याचे चिंतन आपण करायला हवे. त्यामुळे नेमकी चूक कुठे होते याची कारणे लक्षात येतील. सध्या देश असो की राज्य यामध्ये विशिष्ट शक्ती कार्यरत झाले आहे. त्यामुळे आपण आपल्या गावाचा विकास कसा होईल, याकडे लक्ष द्यावे. माणूस हा कर्तव्याने मोठा होतो. त्यामुळे आपले कर्तव्य पार पाडणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रशासन पातळीवर मांडायला हवे. केवळ राज्यात सत्ता गेली म्हणून आपण शांत बसून चालणार नाही, असे ही त्या म्हणाल्या. या मेळाव्याला अमरावती तालुका कॉंग्रेस कमिटी, तिवसा विधानसभा युवक काँग्र्रेस, महिला काँग्रेस व कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन हरीश मोरे यांनी, तर आभार नंद खडसे यांनी मानले. (प्रतिनिधी)