अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत कामकरी हत्तींना दररोज सकाळी गूळपोळीचा नाष्टा दिला जातो. त्यात एक शिळी पोळी अन् त्यावर गुळाचा खडा असतो. रात्रभर जंगलात भटकंती करून हत्ती या नाष्ट्याकरिता न चुकता स्वत:हून नियोजित ठिकाणावर हजर होतो.मेळघाटात कार्यरत हे हत्ती वेतन आयोगानुसार सुट्या उपभोगतात. आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक रजाही दिली जाते. वर्षातून एकदा तीस दिवसांची सलग रजा असते. वनविभागाच्या सेवेत वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांना सेवानिवृत्त केले जाते. सेवानिवृत्तीनंतर पेन्शन म्हणून शासनाकडून त्याला नियमित अर्धा आहार पुरविण्याची तरतूद आहे आणि मरेपर्यंत जंगलातील चारा खाण्याची त्यास मुभा आहे. व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गंत वन आणि वन्यजीव संरक्षणार्थ व पर्यटन यात या हत्तींची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या प्रत्येक हत्तीचे एक स्वतंत्र डाएट रजिस्टर असून, कामाची नोंद घेणारे लॉगबुकही आहे. यात हत्ती केव्हा, कुठून आला याच्याही नोंदी आहेत.शासकीय आहारकामकरी हत्तीला एका दिवसाला १० किलो आटा (पीठ), एक किलो गूळ, एक पाव तेल, एक पाव मीठ एवढे रेशन शासन पुरविते. दररोज सायंकाळी तेल, मीठ, पीठ एकत्र करून त्याचा एकूण दहा पोळ्या बनविल्या जातात. यातील नऊ पोळ्या गुळासोबत त्याला सायंकाळच्या जेवणात दिल्या जातात. सायंकाळच्या जेवणानंतर हा हत्ती आपल्या नियोजित ठिकाणावरून जंगलात चरायला निघून जातो.
मेळघाटात कामकरी हत्तीला गूळपोळीचा नाष्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 01:41 IST
अनिल कडू । लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत कामकरी हत्तींना दररोज सकाळी गूळपोळीचा नाष्टा दिला जातो. ...
मेळघाटात कामकरी हत्तीला गूळपोळीचा नाष्टा
ठळक मुद्देवेतन आयोगानुसार सुट्या । साप्ताहिक रजा अन् सेवानिवृत्तीही