शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहात नाही पाणी नाही, आदिवासी विद्यार्थ्यांचा उपायुक्तांच्या दालनाच ठिय्या

By उज्वल भालेकर | Updated: December 12, 2023 20:40 IST

२०११ च्या शासननिर्णयानूसार वसतिगृहात सुविधा नसल्याचा आरोप.

अमरावती : शहरातील सोनल कॉलनी परिसरात भाड्याच्या इमारतीमध्ये असलेल्या आदिवासी वसतिगृहात मागील चार दिवसांपासून पाणी नसल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. तसेच शासनाच्या निर्देशानुसार, आवश्यक सोयी-सुविधाही वसतिगृहात मिळत नाहीत. त्यामुळे संतप्त आदिवासी विद्यार्थ्यांनी मंगळवारी अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग येथे धडक देत उपायुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.

आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शहरी भागात उच्च शिक्षण घेता यावे, याकरिता एक हजार विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृह चालविण्यात येत आहे; परंतु शहरातील आदिवासी वसतिगृहाची स्वत:ची इमारत नसून भाड्याच्या इमारतीमध्ये ही वसतिगृहे आहेत. या वसतिगृहामध्ये आवश्यक सोयीसुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

मागील चार दिवसांपासून सोनल कॉलनी येथील वसतिगृहात पिण्याच्या पाण्याबरोबरच दैनंदिन वापरासाठी लागणारे पाणी नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अशी परिस्थिती असताना देखील वसतिगृहातील वॉर्डन १५ दिवसांपासून वसतिगृहात आलेले नाहीत. तसेच वसतिगृहामध्ये शासनाच्या २०११ च्या शासन निर्णयानुसार, प्रत्येक वसतिगृहात स्वतंत्र ग्रंथालय, दहा विद्यार्थ्यांमागे एक कॉम्प्युटर व इंटरनेट सुविधा, प्रत्येक वसतिगृहात स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टर बसविणे, दर महिन्यातून एक वेळा विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे, व्यायामासाठी जीमची व्यवस्था करणे, दररोज वसतिगृहाची स्वच्छता, स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकांची सुविधा त्याचबरोबर चार ते पाच वृत्तपत्रे अशा सुविधा देणे अपेक्षित आहे; परंतु वसतिगृहात यापैकी कोणत्याच सुविधा नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 

या मागणीला घेऊन विद्यार्थ्यांनी मंगळवारी आदिवासी विकास विभाग उपायुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी उपायुक्त जागृती कुमरे यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Amravatiअमरावती