शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती महाविद्यालय परिसरात ‘नो टोबॅको’चे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 12:29 IST

प्राथमिक व माध्यमिक शाळांपाठोपाठ महाविद्यालये व अन्य शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखुमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे.

ठळक मुद्देविद्यापीठांनाही सूचना : २०० रुपये दंड

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्राथमिक व माध्यमिक शाळांपाठोपाठ महाविद्यालये व अन्य शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखुमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील विद्यापीठांनाही तंबाखुमुक्तीचे निर्देश दिले आहेत. शाळा-महाविद्यालय परिसर तंबाखुमुक्त करण्यासाठी १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्री होत असल्यास संबंधित शैक्षणिक संस्थांना पोलिसंकडे तक्रार करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहेत.तंबाखू वापरावर प्रभावी नियंत्रणासाठी केंद्र शासनाने सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ केला आहे. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी तंबाखूच्या विळख्यात सापडू नयेत, यासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्थेत तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अधिनस्थ संस्थांना निर्देश दिले आहेत.राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयांचा परिसर तंबाखुमुक्त करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालय, शैक्षणिक संस्थानात धूम्रपान बंदीबाबत सूचना फलक लावण्यात यावा, धूम्रपान करताना अथवा तंबाखू खाताना दिसल्यास तक्रार कुणाकडे द्यावी याबाबतच्या माहितीचा फलक लावण्यात यावा, महाविद्यालयाच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीबंदीबाबतचे फलक प्रवेशद्वारावर लावावेत तसेच १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास संस्थाप्रमुखांना पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संस्थाप्रमुखांनी संस्थेच्या आवाराची तपासणी करून, संस्था आवारात कुठलीही तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध नाहीत. याबाबतचा अहवाल संबंधित शिक्षण संचालकांना द्यावा लागणार आहे.तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ ची महत्त्वाची कलमेकलम ४ : शैक्षणिक संस्थांसह सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे.कलम ६ (अ) : तंबाखू विक्री लहान मुलांना आणि लहान मुलांकडून करून घेण्यास बंदी आहे.कलम ६ (ब) : शैक्षणिक संस्थांपासून १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्रीस बंदी आहे व तसे शाळेच्या प्रवेशद्वारावर फलक लावणे बंधनकारक आहे.वरील नियमांचे पालन न केल्यास २०० रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

टॅग्स :Cigaretteसिगारेटuniversityविद्यापीठ