शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमध्ये उन्हाळ्यात ‘नो रुम’ मुंबई एक्स्प्रेस हाऊसफुल्ल : सुट्या, लग्नप्रसंगांची धूम

By admin | Updated: March 29, 2015 00:41 IST

उन्हाळा सुरु होताच रेल्वे, एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते.

अमरावती : उन्हाळा सुरु होताच रेल्वे, एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते. मात्र, यावर्षी १५ एप्रिलपासून रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण आहे. मुंबई, हावडा, दिल्ली, पटना, चैन्नई, अहमदाबाद कडे ये- जा करणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये ‘नो रुम’ झळकत आहेत.शाळा, महाविद्यालयांना सुट्या लागल्या की, बाहेर गावी जाण्याने नियोजन केले जाते. एप्रिल महिन्यात शाळांना सुट्या लागणार आहेत. त्यानुसार प्रवासाचे नियोजन आखत असताना अनेकांना रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षणाचे ‘नो रुम’ झळकत असल्याने प्रवासाचे नियोजन बदलविण्याचा प्रसंग ओढावत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये एप्रिलमध्ये आरक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे, २१ एप्रिलपर्यंत लग्न प्रसंगाचा मोसम असून या कालावधीत प्रवास करणाऱ्यांची संख्या बरीच मोठी राहणार आहे. एप्रिल, मे महिन्यात ‘समर स्पेशल’ रेल्वे गाड्या सुरु करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असला तरी गर्दी बघता या गाड्यांमधेही आरक्षण मिळणे कठीण आहे. २१ एप्रिलनंतर ये- जा करणाऱ्यांची संख्या बरीच राहणार आहे. काहींनी प्रवासाचे नियोजन म्हणून दोन महिन्यापुर्वीच आरक्षण करुन ठेवले आहे. परंतु वेळेवर प्रवास करण्याचे नियोजन आखणाऱ्यांना हल्ली आरक्षण मिळणे कठीण आहे. विदर्भ एक्सप्रेस आणि अमरावती एक्सप्रसचे वेटींग लिस्ट ही २०० ते ३०० च्या वर पोहचली आहे. एप्रिलपासून चार महिने अगोदर आरक्षणरेल्वे प्रशासनाच्या नवीन निर्णयानुसार १ एप्रिलपासून चार महिने अगोदर रेल्वे गाड्यांचे आरक्षण करण्याची सोय करण्यात आली आहे. यापुर्वी केवळ दोन महिने पुर्वीच गाड्यांचे आरक्षण करता येत होते. मात्र, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी चार महिने पूर्वी रेल्वेचे आरक्षण करता येईल, अशी घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी एप्रिलपासून सुरु होत आहे.