शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

शहरातील संकुलांची पार्किंग झाली 'मिस्टर इंडिया', वाहने पार्क करायची कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 14:23 IST

राजकमल चौक, अंबादेवी मार्ग अनेक व्यावसायिक संकुले आहेत. मात्र, काही अपवाद वगळता एकाही संकुलाकडे हक्काचे पार्किंगस्थळ नाही. त्यामुळे त्या संकुलाशेजारील रस्त्यालाच वाहनतळाचे स्वरूप आले आहे.

ठळक मुद्देसंकुलांकडून पार्किंग गिळंकृत, बांधकाम पूर्ण होण्याआधीच थाटली प्रतिष्ठानेमहापालिकेची परवानगी कशी? वाहनधारकांचा सवाल

अमरावती : पार्किंगच्या नावाखाली शहरातील काही संकुलांनी सार्वजनिक रस्ताच गिळंकृत केला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनेक ठिकाणचे पार्किंग स्थळ तळघरात असून, ते अद्याप सुरू करण्यात न आल्याने संकुलासमोरील सार्वजनिक रस्त्यावर दुचाकी, वाहनांच्या रांगा लागत आहे.

शहरातील बोटावर मोजण्याइतपत व्यावसायिक संकुले सोडली, तर बहुतांश व्यावसायिक संकुलधारकांनी पार्किंगची जागा गिळंकृत केली आहे, तर अनेक ठिकाणी संकुलधारकांकडून सार्वजनिक जागेचा वापर हक्काचे, आमचेच पार्किंग म्हणून केली जात आहे. अनेकांकडून पार्किंग स्थळ खुली केली नसताना महापालिकेच्या बाजार परवाना विभागाने अशा संकुलामधील प्रतिष्ठानांना दिलेली परवानगी संशयाच्या भोव-यात अडकली आहे. या व्यवहारात महापालिकेतील अनेकांचे खिसे गरम झाल्याचे वास्तव आहे. भोगवटदार प्रमाणपत्राशिवाय ‘दुकाने’ चालविली जात आहेत.

महापालिका वा अन्य शासकीय यंत्रणाच्या मालकीचे मोकळे भूखंड पार्किंगच्या नावाखाली घशात घालण्याचे उद्योग तर सुरू नाही ना, अशी शंका यानिमित्ताने उपस्थित केली जात आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने ‘नो पार्किंग’मधील ती वाहने उचलून दंड वसूल करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक देखील अधिकृत पार्किंगस्थळीच आपली वाहने लावतील. दरम्यान, शहरातील अनेक संकुलाची पार्किंग ‘मिस्टर इंडिया’ झाल्याचे वास्तव आहे. महापालिकेच्या एडीटीपी विभागाने अशा इमारतींना, संकुलांना ‘बीसीसी व ओसी’ देताना त्यातील प्रतिष्ठानने परवानगीआधीच सुरू तर करण्यात आली नाही ना, याची खातरजमा करण्याची देखील गरज आहे. परवानगी देताना त्या व्यापारी प्रतिष्ठानाच्या पार्किंगची खातरजमा करण्याची जबाबदारी देखील बाजार परवाना विभागावर येऊन ठेपली आहे.

‘बीसीसी’ नसताना ओपनिंग ?

कुठल्याही इमारतीचे वा संकुलाचे बांधकाम नकाशानुसार पूर्ण झाल्यानंतर बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट अर्थात ‘बीसीसी’ दिले जाते. त्यानंतर अग्निरोधक यंत्रणेसह अन्य मूलभूत सुविधा, नकाशाप्रमाणे बांधकाम झाले की नाही, त्याची खातरजमा केल्यानंतर ‘ऑक्युपंन्सी सर्टिफिकेट’ दिले जाते. मात्र, या दोन्ही सर्टिफिकेटआधीच मॉलमधील दुकानांचा, गाळ्यांचा वापर कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘बीसीसी व ओसी’ असल्याखेरीज कुठल्याही संकुलाचा, इमारतीचा वापर करता येत नाही. त्यामुळे महापालिकेच्या बाजार परवाना विभाग व एडीटीपी विभागाच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राजकमल चौकात लागतात रांगा

राजकमल चौक, अंबादेवी मार्ग अनेक व्यावसायिक संकुले आहेत. मात्र, काही अपवाद वगळता एकाही संकुलाकडे हक्काचे पार्किंगस्थळ नाही. त्यामुळे त्या संकुलाशेजारील रस्त्यालाच वाहनतळाचे स्वरूप आले आहे. जी जागा पार्किंगसाठी आरक्षित ठेवायला हवी होती, त्याठिकाणी दुकाने काढण्यात आली. तर काही ठिेकाणी भंगार साठविण्यात आले आहे. एवढ्या बड्या संकुलांना वाहनतळाशिवाय परवानगी मिळालीच कशी, असा सवाल आहे. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने रस्त्यावर वाहने ठेवावी लागतात. चोरीला गेल्या की भूर्दंड सहन करावा लागतो तो वेगळाच.

टॅग्स :Parkingपार्किंगTrafficवाहतूक कोंडीlocalलोकल