शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ना परवाना, ना विमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:12 IST

पान ३ चांदूर बाजार : शहरांसोबत ग्रामीण भागातसुद्धा आवश्यक कागदपत्रांशिवाय शेकडो वाहने रस्त्यावरून धावत आहेत. त्यात चोरीचा वाहने असण्याची ...

पान ३

चांदूर बाजार : शहरांसोबत ग्रामीण भागातसुद्धा आवश्यक कागदपत्रांशिवाय शेकडो वाहने रस्त्यावरून धावत आहेत. त्यात चोरीचा वाहने असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. बहुतांश वाहने परवाना व इन्शुरंसविना चालविली जात आहेत.

दिवसेंदिवस शहरात दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या वाढत चालली आहे. यात शहरात वाहतूक पोलिसांचा कोणतेच धाक नसल्याने अनेक अल्पवयीन तसेच विनापरवाना असलेले वाहनचालक सर्रासपणे वाहन चालवत आहेत. अनेक अल्पवयीन वाहनचालक मालवाहू वाहनेसुद्धा चालवत असून, त्याकडे पोलीस प्रशासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. एवढेच नव्हे तर या वाहनांची कागदपत्रे नेमकी कोणी तपासावी, याबाबत पोलीस प्रशासनातसुद्धा एकमत नाही.

शहरात वाहतूक सुरळीत राहावी म्हणून वाहतूक शिपायाची नेमणूक करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम पाळावे, वाहनचालकाकडे परवाना नसेल, तर त्याच्या कागदपत्रांची तपासणी करावी व वाहतुकीला अडथळा आणल्यास त्या वाहनावर कारवाई करावी, यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक असते. मात्र, शहरातील वाहतूक पोलीस कधीच रस्त्यावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत करताना दिसत नाहीत. वाहतूक पोलिसांकडून चारचाकी व दुचाकी वाहनांची तपासणी करताना येथे अद्यापही नागरिकांनी बघितले नाही. वाहतूक पोलीस केवळ मालवाहू वाहनांची अडवणूक करून पठाणी वसुली करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतर्फे केला जात आहे.

बॉक्स १

स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये महिन्यापूर्वी रुजू झालेले पोलीस निरीक्षक सुनील किणगे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करतील, असा विश्वास नागरिकांना होता. मात्र, स्थानिक पोलिसांचे वाहतूक व्यवस्थेवर हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे. शहरात दररोज शेकडो ऑटोरिक्षा, काळी-पिवळी वाहने, खासगी ट्रॅव्हल्स शासनादेशाची पायमल्ली करीत आहेत.

--------------------