शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

नव्या आरोग्य केंद्रांना ना निधी, ना जागा

By admin | Updated: January 15, 2015 22:42 IST

राज्याच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिलेल्या जिल्ह्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि ३५ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना हिरवी झेंडी दिली आहे. मात्र नव्याने आरोग्य केंद्राच्या उभारणीत विविध

अनावस्था : जिल्ह्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३५ उपकेंद्रांचे भिजत घोंगडे जितेंद्र दखने - अमरावतीराज्याच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिलेल्या जिल्ह्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि ३५ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना हिरवी झेंडी दिली आहे. मात्र नव्याने आरोग्य केंद्राच्या उभारणीत विविध अडचणी उभ्या राहिल्या आहेत. यामध्ये काही ठिकाणी आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी जागा मिळत नसल्याने प्रस्ताव रखडले आहेत. दुसरीकडे यासाठी अद्याप निधी मिळालेला नाही. त्यामुळे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व ३५ आरोग्य उपकेंद्र उभारण्याची शक्यता धुसर होण्याची चिन्हे अधिक आहेत.जिल्ह्यातील १४ पैकी बारा तालुक्यांत सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३५ आरोग्य उपकेंद्र शासनाने मंजूर केले आहेत. यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण झाले असल्याचे सांगितले जात असले तरी जागा व निधीअभावी ही कामेच ठप्प आहे. यासाठी अधिकाऱ्यांकडून सतत पाठपुरावा केला जात आहे. परंतु यश अद्याप मिळालेले नाही. यावर जि.प.च्या सभेत पदाधिकारी व सदस्यांनी आवाज उठविला. मात्र लोकप्रतिनिधीना यश आले नाही. अशातच एनआरएचएमचे अनुदान रखडल्यामुळे याचा परिणाम आरोग्य केंद्रावर झाला आहे. आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रांना बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला नसल्याने अडचणीत भर पडली आहे. ेअशातच ग्रामपंचायतींकडून जागा उपलब्ध होत नाहीत. जेथे जागा उपलब्ध आहेत तेथे जिल्हा परिषद प्रशासनाकडूनही जागेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जात नाही अन निधीचाही पत्ता नाही, अशा विविध समस्यांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे संकटात सापडली आहेत.