शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
4
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
5
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
6
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
7
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
8
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
9
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
10
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
11
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
12
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
13
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
14
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
15
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
16
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
17
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
18
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
19
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
20
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे

इ-वे बिल नाही, सुपारीच्या वाहनाला १० लाखांचा दंड

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 26, 2024 2:42 PM

अमरावती लोकसभा : नांदगाव नाक्यावर जीएसटी विभागाच्या पथकाची कारवाई

अमरावती : ई-वे बिल नसणाऱ्या वाहनांवर १० लाखांपेक्षा जास्त दंडाची कारवाई  येथील जीएसटी विभागाच्या पथकाने नांदगाव टोल नाक्यावर कारवाई केली. राष्ट्रीय महामार्गावर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदगाव टोल नाक्यावर वाहनांची तपासणी केली असता हा प्रकार आढळून आला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमरावती येथील राज्यकर जीसटी विभागाचे पथकाने तीन दिवस वाहन तपासणी मोहीम राबविली.

निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभन म्हणून देण्यात येण्याऱ्या भेटवस्तू तपासणी करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी निर्देश दिले होते. या मोहिमेत जीएसटी विभागाचे १० अधिकारी व ४० कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आलेले आहे. त्याद्वारे एक हजारावर वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या कारवाईत राजेश चेचेरे, वृषाली देशमुख, आकाश जैस्वाल, नीलिमा आटे आदींनी सहकार्य केले.या मोहिमेत अमरावती कार्यालयाचे संदीप ठाकरे, विनोद इंगळे, अप्पासाहेब देशमुख, अंकुश देशमुख, निलेश क्षीरसागर, जयंत उमप, प्रफुल गावंडे, वैशाली हरणे, शिल्पा पाटील, स्वाती दैने, पल्लवी नेरकर, प्रज्ञा गेडे, प्रिया भाले आदी अधिकारी सहभागी असल्याचे जिल्हा नोडल अधिकारी उज्वल देशमुख यांनी सांगितले. यापुढेही कठोर कारवाही करण्यात येणार असल्याचे विभागीय राज्यकर सहआयुक्त संजय पोखरकर यांनी सांगितले. आचार संहितेच्या काळात विभागात २५ लाख दंड वसूल करण्यात आलेला आहे. या कारवाईचे संनियंत्रण राज्य कर सहआयुक्त, विभागीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त रामदास गडपायले, योगेश आढाव, राजेश दुधे व प्राजक्ता चौधरी करीत आहेत.दिल्लीला नव्हे अहमदाबादला जात होती सुपारीकारवाईत ट्रकमधील सुपारी दावणगिरी (कर्नाटक) वरून दिल्लीला जात असल्याचे दर्शविण्यात आले. प्रत्यक्षात हा माल नागपूर येथून अहमदाबाद येथे जात असल्याचे ट्रक चालकाचे बयान आहे. मालाची किंमत ३२ लाख रुपये दाखविण्यात आली असली तरी बाजारभावानुसार एक कोटींवर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित व्यापारी व ट्रान्सपोर्टरवर २०० टक्के दंडाव्यतिरिक्त जीएसटी कायद्यातील कलमानुसार कारवाही करण्यात आल्याचे पथक अधिकारी प्रिया भाले यांनी सांगितले.

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकAmravatiअमरावती