शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नाही खर्चाला र्मयादा, ना ईव्हीएम, नोटा

By admin | Updated: May 31, 2014 23:10 IST

अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २0 जून २0१४ रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका आपण अनुभवल्या असल्या

पसंतीक्रम : शिक्षक निवडणूक जरा ‘हटकेच’अमरावती : अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २0 जून २0१४ रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका आपण अनुभवल्या असल्या तरी ही शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आपल्याला जरा ‘हटके’ वाटल्याशिवाय राहणार नाही. या निवडणुकीत आचारसंहिता तीच आहे. मात्र आचारसंहितेचा बागूलबुवा नाही. लोकसभा निवडणुकीत खर्चाची र्मयादा ८0 लक्ष रूपये होती. मात्र शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत खर्चाची र्मयादा नाही. अद्याप तरी आयोगाने याविषयी काहीच स्पष्ट केलेले नाही. केवळ उमेदवारी दाखल करताना १0 हजार रूपये भरावे लागतात. या व्यतिरिक्त तूर्तास कुठलाही खर्च निर्धारण आयोगाने केलेला नाही.या निवडणुकीत मतदान यंत्राऐवजी मतपत्रिका राहणार आहे व त्यावर मतदानाचा शिक्का मारण्याऐवजी मार्कर पेन द्वारा उमेदवाराच्या पसंतीक्रम लिहावा लागणार आहे. या पसंतीच्या क्रमानुसार मतमोजणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान यंत्र व टपाली मतपत्रिका यावर नोटा (नकारार्थी मत) चे मतदान करायचा हक्क होता. परंतु या शिक्षक मतदारसंघात नकारार्थी मत राहणार नसल्याचे निवडणूक विभागाने सांगितले आहे. विभागाचे मुख्यालय, तसेच या निवडणुकीत सर्वाधिक मते अमरावती जिल्ह्यातील असल्याने व सर्वाधिक मतदान केंद्रदेखील अमरावतीतच असल्याने मतमोजणी ही २४ जूनला अमरावती येथेच होणार आहे. मात्र मतमोजणी कुठे होईल याविषयी आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले नाही. नामांकन अर्ज ३ जून २0१४ पर्यंत स्वीकारले जाणार आहे. या मतदारसंघात ४४ हजार ६५४ मतदार आहे. अद्यापही मतदारांची नावनोंदणी सुरू आहे. यासाठी ४ जून ही शेवटची तारीख असल्याचे सांगण्यात आले.