शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निजामपूरला वादळाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:11 IST

फोटो पी २९ निजामपूर परतवाडा : अचलपूर तालुक्यातील निजामपूर गावात बुधवारी रात्रीला ११ वाजता दरम्यान वादळाने चांगलेच थैमान घातले. ...

फोटो पी २९ निजामपूर

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील निजामपूर गावात बुधवारी रात्रीला ११ वाजता दरम्यान वादळाने चांगलेच थैमान घातले. यात गावातील नऊ ते दहा घरांवरील टिन उडालेत. घरावरील छप्पर कोसळले. गावातील कडूनिंबाची मोठी झाडे उन्मळून पडलीत.

निजामपूर गाव झोपायच्या तयारीत असतानाच अचानक आलेल्या या वादळामुळे गावकरी चांगलेच भयभीत झाले. यात शेतीतील पिकाचेही नुकसान झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

या वादळाची माहिती रात्रीलाच गावकऱ्यांनी तालुका प्रशासनास दिली. गुरुवारी अचलपूर तालुक्यात दुपारी ३.३० ते चार वाजेच्या दरम्यान वादळ झाले. थोडेबहुत पावसाचे थेंबही पडलेत. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शेतातील कांदा झाकण्याकरिता शेताकडे धाव घेतली. लगतच्या ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांनी परतवाडा शहर गाठून शेतातील पीक झाकण्याकरिता वेळेवर जाड प्लास्टिक व ताडपत्रीची खरेदी केली. याकरिता ओळखीच्या दुकानदारांना फोन लावून ती दुकाने वेळेवर त्यांनी उघडायला लावली. यात त्या दुकानदारांनीही गरजू शेतकऱ्यांना तेवढ्याच तातडीने मदतही केली. दरम्यान या वादळामुळे व वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अचलपूर परतवाडा शहरासह ग्रामीण भागात विजेचे येणे जाणे सुरू होते. वीज पुरवठा अधून-मधून खंडित होत होता.