शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

निपाह व्हायरस : आरोग्य यंत्रणा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:12 IST

केरळ येथे निपाह विषाणूमुळे उद्भवणाऱ्या आजाराचा उद्रेक पाहता, अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. निपाह आजाराच्या उपाययोजनेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. सद्यस्थिस्तीत नागरिकांनी केरळ व बांग्लादेशचा प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकेरळ, बांग्लादेश प्रवास टाळा : जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केरळ येथे निपाह विषाणूमुळे उद्भवणाऱ्या आजाराचा उद्रेक पाहता, अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. निपाह आजाराच्या उपाययोजनेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. सद्यस्थिस्तीत नागरिकांनी केरळ व बांग्लादेशचा प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.केरळमध्ये निपाहमुळे आतापर्यंत नऊ जणांचा बळी गेला. या आजाराचा उद्रेक झाला असून, तो अन्य राज्यात पसरू नये, याची खबरदारी आरोग्य विभाग घेत आहे. या आजाराचा महाराष्ट्र राज्याला फारसा धोका नसला तरी राज्यभरात खबरदारी घेतल्या जात आहे. निपाहसदृश आजाराचे सर्वेक्षण सुरू झाले असून, प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपापयोजना आखल्या जात आहेत. निपाह विषाणू सर्वप्रथम १९९८ मध्ये मलेशियामध्ये आढळून आला होता. भारतात सिलिगुडी (२००१) आणि नाडिया (२००७) या पश्चिम बंगालच्या भागात या विषाणूचा उद्रेक यापूर्वीच झाला होता. बांग्लादेशात या आजाराचा उद्रेक दरवर्षीच दिसून येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रसार होऊ नये, याची खबरदारी जिल्ह्यात घेतली जात आहे.मागील तीन आठवड्यात केरळमधील कोझिकोडे परिसरात, ईशान्य भारतात किंवा बांग्लादेश सीमेलगतच्या भागात प्रवास करणाºयांना जर निपाहची लक्षणे आढळून आली असले, त्यांनी त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क करणे आवश्यक आहे.विषाणूचा प्रसार होतो कसा?निपाह विषाणूचा प्रसार हा फळांवर जगणाºया वटवाघळांमार्फत होतो. वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्ल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांनादेखील निपाहची बाधा होऊ शकते. निपाह विषाणूची लागण संसर्गातून दुसºया माणसाला होऊ शकते. रुग्णावर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांनाही लागण होऊ शकते. वटवाघळाच्या स्रावामुळे दूषित झालेला खजुराच्या झाडाचा रस पिल्यानेदेखील या विषाणूचा प्रसार होतो.शेतात, जंगलात पडलेली फळे खाणे टाळानिपाह विषाणुमुळे होणारा आजार हे वटवाघळाच्या स्रावातून पसरतो. वटवाघूळ हे शेतात किंवा जंगलात झाडावरील फळे खातात. त्यामुळे तेथील फळामध्ये वटवाघळांचा स्राव असू शकतो. त्यामुळे शेतात व जंगलात पडलेली फळे खाऊ नका, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.लक्षणेनिपाह विषाणूमुळे उद्भवणाऱ्या आजारात ताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोपाळूपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात.उपचारनिपाह विषाणू आजारावर कोणतेही औषध नाही. रॅबाविरिन हे विषाणुरोधी औषध वापरले जात असले तरी मुख्यत्वे लक्षणाधारित उपचार आणि साह्यभूत शुश्रुषा यावर भर दिला जातो.निपाह विषाणूच्या निदानासाठी आरटीपीसीआर पद्धतीने घसा, नाक, स्राव, मूत्र व रक्त नमुन्यांची तपासणी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे करण्यात येते.निपाह विषाणूमुळे होणाºया आजाराची खबरदारी आरोग्य यंत्रणेमार्फत घेतल्या जात आहे. नागरिकांनी केरळ व बांग्लादेशातील प्रवास टाळावा. ज्यांनी आठ दिवसांपूर्वी केरळ व बांग्लादेशात प्रवास केला असेल आणि निपाहची लक्षणे आढळून आली असतील, त्यांनी त्वरित जवळच्या आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा.- श्यामसुंदर निकमजिल्हा शल्यचिकित्सकअमरावती.