शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षांनंतर मनोरुग्ण सुखरूप घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 23:04 IST

नऊ वर्षांपूर्वी बहिणीच्या घरून निघून गेलेला मनोरुग्ण केरळ येथील सामाजिक संस्थेच्या मदतीने घरी सुखरूप परतला. त्याच्या परतण्याने आर्वी तालुक्यातील परतोडा येथील त्यांच्या कुटुंबीयांसह तिवसा येथील त्यांच्या बहिणीच्या कुटुबांच्या आनंदास पारावर राहिला नाही.

ठळक मुद्देकेरळच्या सामाजिक संस्थेची मदत : नातेवाईक गहिवरले

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : नऊ वर्षांपूर्वी बहिणीच्या घरून निघून गेलेला मनोरुग्ण केरळ येथील सामाजिक संस्थेच्या मदतीने घरी सुखरूप परतला. त्याच्या परतण्याने आर्वी तालुक्यातील परतोडा येथील त्यांच्या कुटुंबीयांसह तिवसा येथील त्यांच्या बहिणीच्या कुटुबांच्या आनंदास पारावर राहिला नाही.धर्मपाल सुखदेवराव तिखाडे (५२, रा. परतोडा) हे मनोरुग्ण तिवसा येथील संगीता दहाट या त्यांच्या बहिणीच्या घरून नऊ वर्षे आधी निघून गेला होते . ते जीवित आहे की कसे, या विवंचनेत कुटुंब होते. गुरुवारची सकाळ त्यांच्या परिवाराला आनंद देणारी ठरली. केरळ येथील दिव्य गारूना या सामाजिक संस्थेने धर्मपाल यांचा मुलगा रूपेशकडून ते त्याचेच वडील असल्याची खातरजमा केली. ते सुखरूप आहेत. तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्यांना घेऊन येत आहोत, असे म्हणत व्हॉट्सअप वरून व्हिडीओ कॉल केला. शुक्रवारी धर्मपाल तिखाडे यांना त्यांचे घरी गावी परतोडाला सुखरूप घेऊन आले. त्यांचे पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण, भाचे व लोकांना विश्वासच बसत नव्हता. तथापि, ते सुखरूप दिसल्यानंतर कुटुंबातील सदस्य व बहिणीला आनंद मावेनासा झाला. सामाजिक संस्थेच्या एलिसा बर्थ व अजित तोमस यांनी बांधीलकी जपली.