अमरावती : पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने १ जून रोजी सक्करसाथ येथील जुगारावर धाड घालून नऊ जणांना अटक केली. ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस सूत्रांनुसार, पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या आदेशान्वये विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक पंकज चक्रे यांच्या नेतृत्वातील पथकाने गोपनीय माहितीवरून मंगळवारी खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सक्करसाथ येथील बालाजी मंदिरामागे धाड टाकली. येथे पत्त्यांचा जुगार खेळत असलेले जफर शाह मुन्नूशाह, मुकेश विठ्ठलदास बागडे, सैयद वसीम सैयद नूर, नरेश मनिराम
खोब्रागडे, गजानन महादेवराव वाघ, प्रवीण महादेवराव कडू, प्रमोद
किसनराव खांडेकर, शफी अहमद अब्दुल रशीद, रीतेश जगदीशप्रसाद शर्मा यांना अटक करण्यात आली.
त्यांच्या ताब्यातून रोख २१ हजार २०० रुपये व २० हजारांचे दोन मोबाईल असा ४१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला.