शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात एसटी अपघातात नऊ जणांचा मृत्यू

By admin | Updated: January 25, 2016 00:24 IST

एसटी ही सामान्य माणसांची जीवनवाहनी ठरली आहे. एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास मानला जातो.

गंभीर, किरकोळ ४७ अपघात : रस्ता सुरक्षा सप्ताह, सुरक्षित सेवेची एसटीची हमी संदीप मानकर अमरावतीएसटी ही सामान्य माणसांची जीवनवाहनी ठरली आहे. एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास मानला जातो. इतर खासगी वाहनांच्या तुलनेत एसटी अपघाताची टक्केवारी जरी कमी असली तरी जानेवारी ते डिसेंबर २०१५ या वर्षात एसटी अपघातात ९ जण दगावले आहे. यामध्ये २७ गंभीर अपघात घडले, तर १३ किरकोळ अपघात घडले आहेत, असे एकूण ४७ अपघात घडले आहेत. सध्या रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे. अपघात टाळण्यासाठी चालकांसाठी अनेक शिबिरे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रादेशिक व विभागीय कार्यालयाच्यावतीने राबविण्यात आले. एसटी अपघातात अमरावती आगारात २, वरुडमध्ये २, मोर्शी २, चांदूरबाजार १ व परतवाडा आगारात १ मृत्यूमुखी पडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. एसटी कुणाला देते अपघात 'क्लेम' ?जर एखाद्या व्यक्तीचा एसटी अपघातात मृत्यू झाला असेल तर मोठ्या वाहनाला मदत देत नाही. पण मृताच्या वारसाने 'क्लेम' केल्यास तीन लाखांपर्यंत महामंडळाच्यावतीने मदत देण्यात येते. पायी चालणारा प्रवासी, सायकलस्वार, बैलगाडीस्वार, कटलारिक्षा, चालक असा व्यक्ती एसटी अपघातात सापडला असता तो क्लेमसाठी पात्र ठरतो. दोषी चालकावर निलंबनाची कारवाईअपघातात एसटीचा चालक दोषी असेल तर या केसचा निकाल लागेपर्यंत त्याला निलंबित करण्यात येते. त्याला जबाबदार असेल तर आरोपपत्र दाखल करण्यात येते. अपघातानंतर दोषी नसेल व चालक कामावर रुजू होताना उजळणी प्रशिक्षण शिबिर राबवून त्यांना कर्तव्यावर पाठविण्यात येते.