शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निमखेडच्या मुलाची हत्या नव्हे, नरबळीच ?

By admin | Updated: November 8, 2015 00:15 IST

निमखेड येथे चार दिवसांपूर्वी घडलेली घटना ही मानव जातीला काळिमा फासणारी आहे. या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला.

तपासणीची मागणी : अनेकांचा सहभाग असल्याचा संशयसुमित हरकूट चांदूरबाजारनिमखेड येथे चार दिवसांपूर्वी घडलेली घटना ही मानव जातीला काळिमा फासणारी आहे. या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला. गावातील म. उजैफ या १३ वर्षीय शाळकरी मुलाची निर्घृणपणे हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत विहिरीत टाकले. हत्येचा एकंदरीत प्रकार पाहता ही हत्या नसून नरबळीचा प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे. निमखेड गावातील म. कलीम शे. नाशीर (४०) यांना दोन अपत्ये आहेत. मुलगा मोठा, पाच वर्षाची मुलगी आहे. त्यांचा मुलगा चांदूरबाजार येथील नगरपरिषद उर्दू विद्यालयात शिकत होता. मो. उजैफची निर्घृण हत्या करून नराधमांनी घात केला व त्याच्या माता-पित्याचे स्वप्न धुळीत मिळाले. या घटनेने त्याचे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गावाला हादरा बसला. मृताचे प्रेत विहिरीतून काढल्यानंतर त्याचे दोन्ही हात व पाय मागच्या बाजूला बांधलेले होते. गळ्याच्या मागच्या बाजूस दोन्ही कानापर्यंत धारदार शस्त्राचा घाव घालून त्याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत विहिरीत टाकण्यात आले असल्याचे समजते. प्रत्यक्ष घटनास्थळावरून प्रेत बासाला लटकवून आणले असल्याची शक्यता गावकऱ्यांनी वर्तविली. कारण विहिरीजवळ एक बासा रक्ताने माखलेला आढळला. तो बासा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. एकंदरीत प्रेताची पाहणी केली असता हा प्रकार नरबळीच आहे, अशी शंका मृताच्या आजोबांसह गावकऱ्यांनी व्यक्त केली.आमच्या मुलाच्या हत्येचा शोध घेऊन संबंधित दोषींना फासावर लटकवा. हत्याऱ्यांचा त्वरित शोध घेण्यासाठी तपास सीआयडीकडे द्या, ज्या निर्दयतेने आमच्या मुलाचे प्राण घेण्यात आले यावरून हा नरबळीच आहे, असे स्पष्ट होते. त्या नराधमांचा पोलिसांनी त्वरित शोध घ्यावा.- म. करीम शे. नसीर, साजेदा तब्बसुम, (मृताचे आई-वडील)या घटनेच्या तपासाकरिता दोन पथके तयार केली आहे. एक पथक स्थानिक ठाण्यांतर्गत, दुसरे ग्रामीण पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनात अमरावती येथून तपास कार्यरत आहे. दोन्ही पथकांचे तपास सुरू आहे. एक पथक मध्यप्रदेशातील आठनेरकडे रवाना झाले आहे. लवकरच आम्ही आरोपीचा शोध घेऊ.- सतीशसिंह राजपूत, ठाणेदार.मागील १५ वर्षांपासून आमचे गाव आदर्श गाव म्हणून गणले गेले आहे. परंतु या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरला आहे. ही घटना नरबळीची असून या घटनेचा तपास सीआयडीकडे द्यावा, अशी आमची मागणी आहे. गाव पातळीवरून गावातील व परिसरातील घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना देऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना सदैव मदत करीत आहे.- मो. जफीर शे. बशीर, अध्यक्ष, तंटामुक्ती समिती.