शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतीला जाळीचे कुंपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 22:23 IST

व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतीला वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या पीक नुकसानाच्या कारणास्तव शेती आणि जंगलाच्या मध्ये तारेच्या जाळीचे कुंपण घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतून व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देशासन देणार ९० टक्के रक्कम : शेतकऱ्यांना वन्यजीवांच्या हैदोसापासून मिळणार मुक्तता

अमरावती : व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतीला वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या पीक नुकसानाच्या कारणास्तव शेती आणि जंगलाच्या मध्ये तारेच्या जाळीचे कुंपण घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतून व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.शेतातील पीक रानडुक्कर, नीलगाय आदीे वन्यप्राण्यांमुळे उद्ध्वस्त होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीत वाढ झाली आहे. वनविभागाकडून शेतकºयांना पीक नुकसानभरपाई दिली जात असली तरी ही रक्कम तुटपुंजी असल्याची ओरड शासनाकडे आमदारांनी केली आहे. मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढीस लागला असून, हे टाळण्यासाठी शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेंतर्गत वनाशेजारी गावकºयांना विविध योजना राबवून त्यांचे बळकटीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शासननिर्णय क्रमांक ०५१७ अन्वये २१ मे २०१८ नुसार राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्यात मेळघाट, पेंच, ताडोबा, नागझिरा व बोर व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतकऱ्यांना पीक नुकसान टाळण्यासाठी संवेदनशील भागातील शेतीला जाळीचे कुंपण देण्याचा निर्णय झाला आहे.अशी आहे योजनाज्या शेतकऱ्याची शेती व्याघ्र प्रकल्प व अतिसंवेदनशील भागास लागून आहे, अशा १० अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत सामूहिक लाभ घेता येईल. एक हजार मीटर लांब जाळीचे कुंपण शेतीला केले जाणार आहे. कुंपणाची उंची १.८० मीटर असणार आहे. १० वर्षांपर्यत कुंपण व्यवस्थित ठेवावे लागणार आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी १०० रोपे शेतात लावून त्यांचे संगोपन करावे लागणार आहे.वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्गावर कुंपण नाहीव्याघ्र प्रक ल्पानजीक शेतकऱ्यांना सामूहिक जाळीचे कुंपण देताना त्यासाठी होणाऱ्या खर्चाचा ९० टक्के वाटा शासन उचलणार आहे. १० टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा करावी लागेल. मात्र, वाघ, बिबट आदी वन्यप्राण्यांचा भ्रमण मार्ग असल्यास त्या ठिकाणी जाळीचे कुंपण केले जाणार नाही.प्रादेशिक वनविभागाला वगळलेराज्यात व्याघ्र प्रकल्प वगळता प्रादेशिक वनविभाग जंगलाशेजारील शेतात पीक नुकसानाच्या सातत्याने घटना घडल्या आहेत. या भागात वन्यप्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त आहेत. मात्र, प्रादेशिक वनविभागाला या योजनेतून वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांमध्ये वनविभागाप्रति रोष व्यक्त केला जात आहे.व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतात जाळीचे कुंपण लागणार असल्याने वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान टाळता येईल. शासनाची ही योजना गरीब, सामान्य शेतकऱ्यांसाठी मैलाचा दगड ठरणारी आहे.- सुनील लिमयेअपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग, नागपूर.