शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘एक्साईज’ची रात्री नाकाबंदी

By admin | Updated: February 21, 2017 00:09 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर अवैध दारू विक्री,

वाहनांची तपासणी : वर्धा, मध्यप्रदेश सीमेवर लक्ष्यअमरावती : राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर अवैध दारू विक्री, बेकायदेशीर मद्य वाहतुकीस ‘ब्रेक’ लावण्यासाठी सीमेवर रविवारी रात्रीपासूनच नाकाबंदी चालविली आहे. यात वेगवेगळे चार फिरते पथक नेमण्यात आले आहेत. एक्साईजचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनात निवडणुकांच्या काळात अवैध दारू विक्री तसेच वाहतुकीस लगाम लावण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकांसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून दारूचे वाटप मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र तीन दिवसांपूर्वीच दारू विक्री बंदचे धोरण शासनाचे आहे. या धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मध्यप्रदेश अथवा वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरून जिल्ह्यात दारूचा साठा येणार असल्याच्या पार्श्वभूमिवर नाकाबंदी करण्यास प्रारंभ केला आहे. वाहनांची तपासणी करण्यासाठी चार पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून सहा महिला पोलीस कर्मचारी नियुक्ती करण्यात आले आहे. पथकात एक निरीक्षक, तर दोन दुय्यम निरीक्षकांचा समावेश आहे. हे विशेष पथक राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील ढाबे, हॉटेल्स, पानटपरी आदी प्रतिष्ठानांची तपासणी करीत आहेत. या पथकाच्या सोबतीला वनविभाग, पोलीस, महसूल व महापालिकेची चमू कार्यरत आहे. मोर्शी, वरुड, परतवाडा, धामणगाव रेल्वे, तिवसा आदी प्रमुख मार्गावर ये - जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. विशेषत: मध्यप्रदेश व वर्धा जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांवर पाळत ठेवली जात आहे. तसेच शहरी भागातून ग्रामीणमध्ये येणारी वाहने, दूध विक्रेते आदींवर करडी नजर ठेवली जाणार आहे. राज्य मार्गावरील सीमावर्ती नाक्यांवर ‘एक्साईज’चे अधिकारी वाहनांची तासणी करीत आहेत. रविवारी मध्यरात्री अवैध दारू वाहतूक करणारे चार जण ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चार हजार रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)रेल्वे पोलिसांसोबत पत्रव्यवहारपरप्रातांतून येणाऱ्या रेल्वे गाड्यांतून अवैध दारू येणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शल्क विभागाला मिळाली आहे. त्याअनुषंगाने एक्साईज अधीक्षकांनी रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाच्या निरिक्षकांना पत्र पाठवून रेल्वे गाड्यातून दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती कळविली आहे. अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांवर पाळत ठेवण्याचे या पत्रात नमूद आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध दारु विक्री अथवा वाहतूक होता कामा नये, यासाठी सर्वंकष उपाययोजना ‘एक्साईज’ने आखल्या आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून अवैध दारु विक्री आणि वाहतूक विरुद्ध कारवाई सुरू आहे. चार विशेष पथकाद्वारे नियंत्रण ठेवले जात आहे. रात्रीची गस्त त्यावर मॉनिटरींग सुरु आहे.- प्रमोद सोनोेने, अधीक्षक, एक्साईज अमरावती