शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एनजीओअभावी मोकाट कुत्र्यांची नसबंदी थांबली

By admin | Updated: August 23, 2015 00:39 IST

मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून त्यांच्या बंदोबस्तासाठी आवश्यक नसबंदी प्रक्रिया अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड आॅफ आॅफ इंडियाच्या जाचक अटीमुळे एनजीओ पुढाकार घेत ...

दीड वर्षांपासून संख्या वाढली: सर्वोच्च, उच्च न्यायालयाचे कुत्र्यांना न मारण्याचे आदेश अमरावती : मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून त्यांच्या बंदोबस्तासाठी आवश्यक नसबंदी प्रक्रिया अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड आॅफ आॅफ इंडियाच्या जाचक अटीमुळे एनजीओ पुढाकार घेत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. परिणामी गल्लीबोळात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढीस लागली आहे.शहरातील मोकाट कुत्रे, पशुंवर नियंत्रणाची जबाबदारी महापालिका पशु वैद्यकीय विभागाची आहे. मात्र मोकाट कुत्र्यांच्या समस्येविषयी नगरसेवक अथवा नागरिकांच्या तक्रारी येत असताना या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे शक्य होत नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. ही संस्था अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड आॅफ इंडिया यांच्याकडे नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. अन्यथा मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कंत्राट प्रक्रिया राबविता येत नाही. तसेच सन २००१ च्या प्राणी क्लेषदायी कायद्यान्वये कुत्र्यांना जीवे मारता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे आहे. महापालिका प्रशासन यापूर्वी मोकाट कुत्र्यांवर पशु कोंडवाड्यात शस्त्रक्रिया करुन आठ दिवसानंतर त्याच भागात नेऊन सोडून द्यायचे. परंतु एनजीओमार्फतच कुत्रे पकडून शस्त्रक्रिया ही प्रक्रिया राबवावी, हे मार्गदर्शक तत्त्वे आल्यामुळे अ‍ॅनिमल बोर्डाशी नोंदणीकृत संस्थांना निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महापालिकेने नऊवेळा निविदा काढली. मात्र अ‍ॅनिमल बोर्डाशी नोंदणीकृत एकाही एनजीओंनी कुत्रे पकडणे, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. त्यामुळे दीड वर्षांपासून कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्याची प्रक्रिया थंबविली आहे. मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना देखील उघडकीस आल्या आहेत. दरम्यान नगरविकास विभागाने मोकाट कुत्र्यांवर के ल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा अहवाल महापालिका प्रशासनाकडून मागविला होता. मोकाट पशुंचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका अर्थसंकल्पात स्वतंत्र शिर्ष्य असून त्याकरीता निधी देखील राखीव आहे. मात्र अ‍ॅनिमल बोर्डाशी नोंदणीकृत संस्था पुढे येत नसल्याने मोकाट कुत्र्यांना पकडणे, शस्त्रक्रिया करणे हा विषय थंडबस्त्यात आहे.