शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

अचलपूर उपविभागात प्रथेला बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:33 IST

प्रजासत्ताकदिनी अचलपूर-चांदूरबाजार या उपविभागात तालुकास्थळी झालेल्या पथसंचलनासाठी पोलिसांची तुकडी अधिकाऱ्यांनी पाठविलीच नाही.

ठळक मुद्देपाच कर्मचारी पाठविले : दोन्ही तालुक्यांत पथसंचलनात आलीच नाही पोलीस तुकडी

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : प्रजासत्ताकदिनी अचलपूर-चांदूरबाजार या उपविभागात तालुकास्थळी झालेल्या पथसंचलनासाठी पोलिसांची तुकडी अधिकाऱ्यांनी पाठविलीच नाही. येथील एसडीओ कार्यालयावर केवळ पाच कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले.स्वातंत्र्यानंतर तालुका स्तरावर होणाऱ्या पथसंचलनासाठी पोलिसांचे एक पथक शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, होमगार्ड आदींसोबत मुख्य कार्यक्रम सोहळ्यात पथसंचलन करते. मात्र, २६ जानेवारीला पोलीस वगळता इतर सर्वांनी पथसंचलनात सहभाग घेतला. विशेष म्हणजे, जिल्ह्यात अचलपूर-चांदूरबाजार वगळता सर्व ठिकाणी मात्र पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली.का उदभवला पेच ?स्वातंत्र्योत्तर काळापासूनची परंपरा अचलपूर उपविभागातच का मोडण्यात आली, याचे उत्तर अजूनही पोलीस आणि महसूलच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सापडले नाही. वरिष्ठांनी तोंडी आदेश दिले; कनिष्ठांनी आपल्या स्तरावर त्याचे पालन केल्याची माहिती आहे. मात्र, जिल्ह्यात अचलपूर उपविभागातील अचलपूर, चांदूरबाजार तालुका मुख्यालयी ध्वजवंदना, पथसंचलनाला तुकडी व अधिकारी येऊ नये यावर चर्चा रंगली होती.एसडीओवर पोलीस कर्मचारीअचलपूर येथील उपविभागीय कार्यालयाच्या ठिकाणी सर्व ठाणेदार, एसडीपीओ आणि कर्मचाºयांची एक तुकडी ध्वजारोहणानंतर एसडीओंना सलामी देते. मात्र, यंदा ही परंपरा मोडून पाच कर्मचारीच पाठविण्यात आले. पथसंचलन सोडून परेड ग्राऊंडवरील सोहळ्यात परतवाडा पोलीस ठाण्यातर्फे सहायक पोलीस निरीक्षकांना पाठवून आधी सलामी देण्यात आली. वरिष्ठांच्या आदेशाचे तंतोतंत पालन ठाणेदारांनी केल्याची चर्चा होती. एकंदर दरवर्षी चालणाऱ्या प्रथांना यंदा फाटा देण्यात आला.जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र निष्प्रभ?परतवाडा ठाणेदारांनी वरिष्ठांच्या आदेशावरून अचलपूर तहसीलदारांना पथसंचलनासाठी पोलीस पथक पुरविणे शक्य नसल्याचे पत्र २४ जानेवारी रोजी उलटटपाली पाठविले होते. पत्राची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यांनी भारतीय ध्वजसंहिता २००६, राष्ट्रीय सन्मान अवमानना प्रतिबंध कायदा १९७१ व भारतीय प्रतीके अधिनियम २००५ अन्वये पत्र पाठवून कुठल्याच प्रकारची हयगय होणार नसल्याचे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठविले. मात्र, सदर पत्राचा अचलपूर व चांदूरबाजार तालुकास्थळी कुठलाच प्रभाव पडला नाही.एसडीपीओंचे ठाण्यात ध्वजारोहणउपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते एसडीओ कार्यालयात दरवर्षी ध्वजारोहण केले जात होते. मात्र, यंदा ते वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांनी परतवाडा ठाण्यात ध्वजारोहण केले. पथसंचलनाचा कुठला अधिनियम नसून, ती एक परंपरा असल्याचे काही अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. परंतु, ती अचलपूर उपविभागातच का मोडण्यात आली, यावर मात्र ते अनुत्तरित होते. २६ जानेवारी रोजी ‘लोकमत’ने या संपूर्ण प्रकरणाचे वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष.