शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

दुसऱ्या दिवशीही लावल्या आगी

By admin | Updated: May 7, 2017 00:08 IST

जिल्ह्यात राज्य महामार्गावरील लहान- मोठी झाडे जाळणारी टोळी सक्रिय झाली आहे.

फौजदारी तक्रारी दाखल करा : अधीक्षक अभियंत्यांचे कार्यकारी अभियंत्यांना आदेशलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात राज्य महामार्गावरील लहान- मोठी झाडे जाळणारी टोळी सक्रिय झाली आहे. शनिवारी दुसऱ्या दिवशीही दर्यापूर- अमरावती राज्य महामार्गावरील झाडे जाळण्यात आल्यामुळे जो कुणी अज्ञात व्यक्ती या झाडांना आग लावून राष्ट्रीय संपतीला बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असेल त्याच्याविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रारी दाखल करून करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता विवेक साळवे यांनी जिल्ह्यातील संबंधित कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. दर्यापूर- मूर्तिजापूर मार्गावरील गणेशपूर नजीकच्या शेताजवळील धुऱ्याला आग लावून जिवंत झाडे जाळण्याचा प्रताप काही अज्ञात व्यक्तीने केला होता. शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दर्यापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अनिल जवंजाळ यांना दिल्यानंतर त्यांनी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते. त्यामुळे त्वरित आगीवर नियंत्रण मिळाल्याने इतर झाडे जळण्यापासून वाचविण्यात आले होते. परंतु यानंतर आगीचे सत्र थांबलेले नाहीत. पुन्हा काही लोकांनी दर्यापूर- अमरावती मार्गाजवळील हॉटेल मोहिनी नजीक आग लावली. त्यामध्ये येथील वाळलेले गवत पेटत जाऊन वीज वितरण कंपनीच्या जिवंत विद्युत तारांनाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे येथे लावण्यात आलेली डीबीसुध्दा जळण्याची शक्यता होती. हा प्रकार गंभीर असून आगी लावून झाडे जाळण्याचा प्रकार त्वरीत थांबवावा, अशी मागणी होत आहे. रोज जिल्ह्यात कुठे ना कुठे आगी लावून जिवंत झाडे जाळली जात आहे. दर्यापूर-अमरावती मार्गावर आतापर्यंत २७ झाडे जाळण्यात आलेली आहेत. अमरावती- चांदूरबाजार मार्गावर नया अकोला जवळ १० ते १५ झाडे जाळून नष्ट करण्यात आलेले आहेत. अनिरूध्द राऊत या सामाजिक कार्यकर्त्याने तर चक्क झाडे जळताना छायाचित्रिकरण मोबाईलमध्ये करून आणली, हा प्रकार थांबविण्याची मागणी केली. तसेच अमरावती- परतवाडा रस्त्या लगतच्या झाडांनाही आगी लावल्या जात आहेत. एकीकडे सामाजिक वनीकरण व इतर विभाग दोन कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे सामाजिक वनिकरण विभागाने लावलेली झाडेसुध्दा या अवैध आगीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मागील दोन वर्षात लावलेली रोपटे आता कुठे मोठी होत आहे. पण शेताच्या धुऱ्या नजीक लावलेल्या आगीत ही रोपटे जळून खाक होत आहे. त्यामुळे सामाजिक वनिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाची मेहनत खऱ्या अर्थाने व्यर्थ जात आहे. झाडांना आगी लावण्याचा प्र्रकार हा गंभीर आहे. मी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना सूचना दिल्या आहे. जर कुणी अज्ञात व्यक्ती हेतुपुरस्सर आगी लावत असेल तर त्याची संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार आहे. - विवेक साळवे, अधीक्षक अभियंता अमरावतीरस्त्यालगतची शेकडो झाडे जाळण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांद्वारे सुरू आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक वनिकरण विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. - शेखर पाटील,सामाजिक कार्यकर्ता दर्यापूर.