शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

आचारसंहितेचा बाऊ कामांना बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 22:43 IST

आचारसंहितेत ‘काय करावे अन् काय करू नये’ याची संहिताच आयोगाने जाहीर केली आहे. मात्र, याला डावलून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना आचारसंहितेचा बाऊ करून माघारी धाडण्याचा प्रकार सध्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांद्वारा बिनबोभाट सुरू आहे. प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसामान्यांना कुणी वालीच नाही, हेच सध्या वास्तव आहे.

ठळक मुद्देनागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आचारसंहितेत ‘काय करावे अन् काय करू नये’ याची संहिताच आयोगाने जाहीर केली आहे. मात्र, याला डावलून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना आचारसंहितेचा बाऊ करून माघारी धाडण्याचा प्रकार सध्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांद्वारा बिनबोभाट सुरू आहे. प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसामान्यांना कुणी वालीच नाही, हेच सध्या वास्तव आहे.एकतर आचरसंहिता जिल्ह्यात लागू झाल्यापासून विकासकामांचे पार मातेरे झाले आहे. यंदाचे आर्थिक वर्ष संपायला उणेपुरे काही दिवस शिल्लक असताना कमी अवधीत अधिकाधिक कामे करून निधी शासनाला समर्पित होणार नाही, याची काळजी घेण्याऐवजी काही महाभागांद्वारा वापस जाणार नाही याची खबरदारी घेतल्यापेक्षा आचारसंहिता सुरू आहे, याचाच अधिक बाऊ केला जात असल्याची शोकांतिका आहे. हा अंगावरचे घोंगडे झटकण्याचा प्रकार निश्चितच आहे. विशेष म्हणजे महापालिका, जिल्हापरिषद व नगरपरिषदांमध्ये हा प्रकार जरा अधिकच असल्याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. काम कुठलेही असो, साहेब इलेक्शन ड्युटीवर आहेत, ही सबब आता नित्याचीच झाली आहे.जिल्ह्यातील १४ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची वर्णी निवडणूक प्रक्रियेत लागली आहे. यामध्ये फक्त काहीच कर्मचारी नियमितपणे निवडणूक कामात आहेत. बहुतांश अधिकारी व कर्मचाºयांची ड्युटी मतदान प्रक्रि येत असल्यामुळे यासंबंधी प्रशिक्षणाचे दोन वा तीन दिवस वगळता त्यांचा नियमित सहभाग निवडणूक कामकाजात नसल्याची जाहीर कबुली जिल्हा निवडणूक विभागाने दिली असल्याने काही अधिकारी व कर्मचारी आचारसंहिता अन् इलेक्श्न ड्युटीच्या नावावर फक्त टोलवाटोलवी करीत असल्याचे वास्तव आहे.जिल्हा परिषदेत सभा महापालिकेत स्थगितीआचारसंहितेच्या काळात धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही. मात्र, नागरिकांचे आरोग्य किंवा यात्सम अन्य विषयांवर आचारसंहितेचा अडसरदेखील नाही. फक्त जिल्हा निवडणूक अधिकाºयांना या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिल्यास याबाबत परवानगी मिळते. झेडपीत झालेल्या सभेत काही विषय निकाली काढले, तर महापालिकेची सर्वसाधारण सभा आचारसंहितेच्या नावाखाली स्थगित करण्यात आली.अधिकारी, कर्मचाऱ्यांचा नवा फंडामहापालिकेतील किमान ४०० अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची यावेळी निवडणूक कामात ड्युटी लावण्यात आलेली आहे. मात्र, एकाच वेळी हे सर्व कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत नाहीत. निवडणूक विभागाला जसजसी गरज भासते तशी या कर्मचाºयांची सेवा घेतली जाते. मात्र, आताही महापालिकेत गेल्यास सर्वत्र शुकशुकाट आहे. कामानिमित्ताने कुणी नागरिक आल्यास त्याला आचारसंहिता आहे किंवा साहेब इलेक्शन ड्युटीवर आहेत. याच धाटणीची उत्तरे देण्यात येतात, याकडे लोकप्रतिनिधीचे किंवा आयुक्तांचे लक्ष नाही.