अमरावती : राष्ट्रीय महामार्गावर बडनेरा ते लोणी दरम्यान जागोजागी खड्डे पडले आहे. अशातच रस्ते चौपदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहनचालकांना रस्ता शोधत पुढे जावे लागत आहे. अनेक दिवसांपासून खड्डे असताना डागडुजी केली जात नाही, अशी ओरड आहे.
------------------------------
अंबा नाल्यात कचऱ्याची समस्या
अमरावती : अंबा नाल्याच्या काठ्यावरील रहिवासी नागरिक नाल्यातच कचरा टाकत असल्यामुळे काही ठिकाणी नाल्यात कचरा तुंबत आहे. सफाई कर्मचारी अंबा नाल्यातून कचरा गोळा करीत नाहीत. त्यामुळे नाल्यात कचरा तशाच पडून राहतो. ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
------------------------
बडनेरा येथील स्मशानभूमीत अस्वच्छता
अमरावती : अकोला मार्गावरील हिंदू स्मशानभूमीत अस्वच्छता कायम असल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी स्मशानभूमीची समस्या सोडवावी, अशी मागणी आहे.
---------------------
समाजकल्याण मार्गावर खड्डे कायम (फोटो आहे)
अमरावती : शहर पोलीस आयुक्तालय ते समाजकल्याण कार्यालय मार्गात खड्डे कायम आहेत. याच रस्त्यालगत आदिवासी विकास, शासकीय प्रयोगशाळा असून, वर्दळीच्या या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.