शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

नवजाताचा गाडलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी काढला बाहेर

By admin | Updated: November 1, 2016 00:10 IST

तीन दिवसांच्या नवजात अर्भकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्यात आला.

हळहळ : सुनेच्या सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोपदर्यापूर : तीन दिवसांच्या नवजात अर्भकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यामुळे सुनेच्या सासरच्या मंडळींनी नवजात नातीची हत्या करून मृतदेह पुरल्याचा आरोप सासूने पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. आजीच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. ही घटना रविवारी म्हणजे दिवाळीच्या मध्यरात्री घडली. बाभळी येथील चंद्रभागेच्या पात्रातून नवजात अर्भकाचे पार्थिव सोमवारी सकाळी बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस सुत्रानुसार, ऋषता हर्षल खंडारे (२३, रा. अमरावती) नामक महिलेला तिच्या माहेरी धामोडी येथे प्रसूतीकरीता आणण्यात आले होते. येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी सकाळी तिला दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने तिला डफरीनला रेफर केले. रविवारी सकाळी ७ वाजता तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. प्र्रकृती चांगली असल्यामुळे तिला सुटी सुद्धा देण्यात आली. बाळाला दाखल केले होते खासगी रुगणालयातदर्यापूर : त्यामुळे ती नवजात बाळासह दर्यापूरला आली. मात्र, पुन्हा बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचाराकरीता आणले. दुर्देवाने उपचारादरम्यान बाळ दगावल्याचे तिच्या माहेरच्या मंडळीची म्हणणे आहे. परंतु हर्षल खंडारेची आई चंद्रकला खंडारे यांनी मुलाच्या सासरच्या मंडळींनी संगनमत करुन बाळाची हत्या केल्याचा व प्रकरण दडपण्यासाठी शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार केल्याची तक्रार पोलिसांत दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. पोलिसांनी हे प्रकरण तपासात घेतले आहे. चंद्रभागेच्या पात्रात अर्भकाला गाढल्याची तक्रार अर्भकाच्या आजीनेच दिल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पुन्हा या अर्भकाला बाहेर काढले. या घटनेचा पुढील तपास दर्यापूरचे ठाणेदार नितीन गवारे करीत आहेत. (प्रतिनिधी)अर्भकाची प्रकृती नाजूक व वजन कमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अमरावतीला नेण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला होता. पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे उपचारादरम्यान ते अर्भक दगावले. - डॉ. राजेंद्र भट्टड संचालक, गोदावरी हॉस्पिटल दर्यापूरअर्भकाच्या शवविच्छेदन अहवालानंतर नेमके मृत्युचे नेमके कारण समोर येईल. या अहवालानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल. तपास सुरु आहे. - नितीन गवारे, ठाणेदार, दर्यापूर