शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१५१ वर्षांनंतर साकारणार नवे सुसज्ज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 15:03 IST

‘जी प्लस फोर’ असलेल्या या नव्या सुसज्ज इमारतीच्या बांधकाम व विद्युतीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा बोलावल्या आहेत.

ठळक मुद्दे२८.३६ कोटींचा खर्च मूळ वास्तू ‘जैसे थे’, सार्वजनिक बांधकाम विभागाने मागविल्या निविदा

प्रदीप भाकरे

अमरावती : इंग्रजांच्या काळात सन १८७१ मध्ये बनलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाची मूळ इमारत अबाधित ठेवून त्याच परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयाची भव्य अशी दुसरी नूतन वास्तू आकारास येणार आहे. २८ कोटी ३६ लाख १२ हजार ६६६ रुपये खर्चून ‘जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, अमरावती’ उभारले जाणार आहे. ‘जी प्लस फोर’ असलेल्या या नव्या सुसज्ज इमारतीच्या बांधकाम व विद्युतीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा बोलावल्या आहेत.

वर्कऑर्डरनंतर २४ महिन्यांमध्ये ही नवी वास्तू संबंधितांना साकारावयाची आहे. त्यासाठी ११ एप्रिल ते ५ मे दरम्यान निविदा उपलब्ध असणार असून, २८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील मुख्य अभियंता कार्यालयात निविदापूर्व बैठक घेतली जाणार आहेत, तर ७ मे रोजी निविदा उघडल्या जाणार आहेत. अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या विद्युतीकरणासह बांधकाम करण्यासाठी नोंदणीकृत व अनोंदणीकृत कंत्राटदारांकडून ऑनलाइन निविदा मागविण्यात आल्या आहेत.

गॅझेटनुसार, सन १९०५ मध्ये स्वतंत्र अमरावती जिल्हा आकारास आला. सन १९५६ मध्ये अमरावती जिल्हा मुंबई राज्याचा भाग होता. १ मे १९६० ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. त्यामुळे अमरावती जिल्हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला.

कलेक्टोरेटचा पसारा मोठा

अमरावती येथे पाच जिल्ह्यांच्या महसूल आयुक्तालयाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या बघता येथील सध्याचे जिल्हाधिकारी कार्यालय अभ्यागतांसह प्रशासकीय संरचनेसाठी, स्टाफसाठीदेखील अपुरे पडत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिनस्थ येणाऱ्या अनेक विभागांची कार्यालये जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच मात्र विखुरलेल्या स्वरूपात आहेत. ती सर्व कार्यालये एका छताखाली आणली जाणार आहेत.

येथे बनणार नवी वास्तू

निवडणूक विभागाची सध्याची इमारत, एमटीडीसी कार्यालय, बॅडमिंटन कोर्ट, ऑफिस १ व २, स्टोअर रूम १ व २ तथा पार्किंग शेडचे निर्लेखन करण्यात येणार आहे. अर्थात आताच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूने नवी वास्तू साकारली जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीचा बिल्टअप एरिया ७२७१ चौरस मीटर असेल. त्यात पार्किंग, लिफ्ट, सुसज्ज दालनांसह पेयजलाची उत्तम व्यवस्था असेल. पहिल्याच निविदा प्रक्रियेत कंत्राटदार फायनल झाल्यास २०२४ च्या मध्यावधीत नवी इमारत पूर्णत्वास जाण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :GovernmentसरकारAmravatiअमरावती