एजन्सी नेमणार: नव्या बांधकामातून १०० कोटींचे लक्ष्यअमरावती : महापालिका हद्दीत दीड लाखांच्या आसपास घरे आहेत. त्यापैकी अनेक घरमालकांनी नव्याने परस्पर बांधकाम केले आहे. मात्र, परंतु या घरांना जुन्याच पद्धतीने कर आकारणी केली जात आहे. अशा वाढीव बांधकाम करणाऱ्या घरमालकांकडून जुनीच कर आकारणी करीत १०० कोटींच्या उत्पन्नाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.हल्ली महापालिकेला मालमत्ता कर आकारणीतून वर्षाकाठी ५२ कोटींचे उत्पन्न मिळते. हे उत्पन्न कोणतीही करवाढ न करता अपेक्षित आहे. मात्र, झपाट्याने नागरी वस्त्यांमध्ये वाढ होत असून घरांची संख्यादेखील वाढली आहे. त्यामुळे मालमत्ता कर आकारणीतून उत्पन्नदेखील वाढावे, यासाठी पाचही झोनमध्ये प्रायोगिक तत्वावर ५०० मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. नव्या बांधकामालाही जुनाच करव्यावसायिक, निवासी, सदनिका, मंगल कार्यालये आणि झोपडपट्ट्यांमधील घरांचा समावेश होता. सर्वेक्षणात जी मालमत्ता घेण्यात आलीत या मालमत्तांवर पूर्वी २२ लाख रुपये उत्पन्न मिळायचे. मात्र याच मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण झाले असता वाढीव बांधकामामुळे आता ६६ लाख रुपये कराच्या रुपात मिळणार आहे. हा प्रयोग महानगरात राबवून कोणतीही कर आकारणी न करता ज्या घरांवर नव्याने बांधकाम करण्यात आले, त्या घरांना जुनीच कर आकारणी करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याकरीता नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यापूर्वी प्रायोगिक सर्वेक्षणाचे काम स्थापत्य कन्सलटन्सी प्रा. लि. कडे सोपविण्यात आले होते. या कंपनीने सर्वेक्षणाचे अहवाल प्रशासनाला सादर केले आहे. नव्याने मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले तर कराचे उत्पन्न हे १०० कोटींच्या वर पोहचेल, असा दावा महापालिका प्रशासनाचा आहे.
मालमत्ता करवाढीसाठी सर्वेक्षणाचा नवा पर्याय
By admin | Updated: January 3, 2015 22:53 IST