शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीतील चार नमुन्यांमध्ये आढळला नवा स्ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:37 IST

गजानन मोहोड अमरावती : जिल्ह्यात महिनाभरात झालेला कोरोनाचा ब्लास्ट पाहता, सात नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात ...

गजानन मोहोड

अमरावती : जिल्ह्यात महिनाभरात झालेला कोरोनाचा ब्लास्ट पाहता, सात नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी चार नमुन्यांमध्ये जनुकीय बदल (म्यूटेशन) झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. याविषयी एनआयव्ही व आयसीएमआरकडे अधिक तपासणी व संशोधन सुरू आहे.

अमरावतीच्या नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचे ‘रेट आफ इन्फेक्शन’ जास्त आहे. संसर्गाची लक्षणे मात्र बदललेली नाहीत. यूके, साऊथ आफ्रिका व ब्राझिलियन म्युटेशनमध्ये व अमरावतीत आढळलेल्या नव्या स्ट्रेनमध्ये साम्य नाही. यात वेगळेपण असल्याची माहिती अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेच्या सूत्रांनी दिली.

दर महिन्याला कोरोनाचे एक ते दोन म्युटेशन होतात. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. यावेळचे म्युटेशन हे ‘एच-१ व एन-१’पेक्षा वेगळे आहे व जास्त गुणाकार पद्धतीने संसर्ग करीत असल्याचे निरीक्षण आहे. एनआयव्ही (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलाॅजी) व आयसीएमआर (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स) कडून याविषयीचा अहवाल अप्राप्त असल्याने अधिक भाष्य करणे योग्य होणार नसल्याचे या सूत्रांनी सांगितले.

नव्या स्ट्रेनला अद्याप नाव देण्यात आलेले नाही. सर्व व्यक्तींना या स्ट्रेनचा संसर्ग सारखाच आहे. साऊथ आफ्रिका, ब्राझिलियन व ११ यूके स्ट्रेनमध्ये एक कॉमन म्युटेशन आहे. ६८-८० डिलीशनदेखील सारखी आहेत. त्र, अमरावतीच्या म्युटेशनमध्ये हा प्रकार नाही. याविषयीचा अहवाल प्राप्त झाल्यावर अधिक सांगता येईल. सध्या या सर्व चर्चाच असल्याचे सूत्र म्हणाले.

कोट

डब्ल्यूएचओ व आयसीएमआरचे अमरावतीकडे विशेष लक्ष अमरावतीमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे व आता नव्या म्युटेशनची नोंद झाल्याने जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) व दिल्ली येथील आयसीएमआर विशेष लक्ष ठेवून आहे व सातत्याने माहिती घेतली जात आहे.

- प्रशांत ठाकरे,

समन्वयक, अमरावती विद्यापीठ विषाणू परीक्षण प्रयोगशाळा.

-----

पुणे ‘एनआयव्ही’ला शुक्रवारी १०० नमुने

पुणे येथील राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेला यापूर्वी यूके रिटर्न व्यक्तींचे चार व नंतर नव्या स्ट्रेनसंदर्भात सात नमुने पाठविण्यात आले होते. आता शुक्रवारी पुन्हा आरोग्य संचालकांच्या निर्देशानुसार चार प्रकारांतील प्रत्येकी २५ असे १०० नमुने पाठवित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी दिली.

------

कोट

पुणे येथील एनआयव्हीला पाठविलेल्या नमुन्यांपैकी चारमध्ये म्युटेशन बदल आढळल्याचे सांगण्यात येत आहे. एनआयव्ही व आयसीएमआरचा अहवाल आल्यावर याविषयी अधिक सांगता येईल.

- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

--------

अमरावती जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह : २७,३२३

आतापर्यंत मृत्यू : ४५२

१८ फेब्रुवारीला पॉझिटिव्ह : ५९७

१७ फेब्रुवारी : ४९८

१६ फेब्रुवारी : ४८५

१५ फेब्रुबारी : ४४९

१४ फेब्रुवारी : ३९९

१३ फेब्रुवारी : ३७६