शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

नव्या शिलेदारांचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2017 00:13 IST

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याची उत्कंठा मागील काही दिवसांपासून ताणली गेली आहे.

झेडपी निवडणूक : काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढतीची शक्यताअमरावती : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याची उत्कंठा मागील काही दिवसांपासून ताणली गेली आहे. उद्या यासंदर्भातील चर्चांना पूर्णविराम मिळणार असून मंगळवारी झेडपीचे नवीन शिलेदार जाहीर होतील. अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे नितीन गोंडाणे तर भाजपचे प्रताप अभ्यंकर यांच्यामध्ये थेट लढत होण्याचा अंदाज राजकीय जाणकार वर्तवित आहेत. भाजपमध्ये अध्यक्षपदासाठी अनिल डबरासे, शरद मोहोड, आशा वानरे यांची नावे देखील स्पर्धेत आहेत. मात्र, नेमकी कोणाला उमेदवारी मिळते, हे निवडणुकी दरम्यान स्पष्ट होईल. काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी सध्या नितीन गोंडाणे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर काँग्रेस, राकाँ, शिवसेनेकडून उपाध्यक्षपदासाठी दत्ता ढोमणे, गणेश सोळंके ही दोन नावे चर्चेत आहेत. उपाध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवारांचे चित्र मात्र अस्पष्टच आहे.स्थानिक जि.प.मध्ये सेना-भाजपसोबत नसल्याने येथील चित्र वेगळे आहे. येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष यांच्यात सत्तेसाठी घरोबा झाला आहे. भाजप १३, युवा स्वाभिमान २, प्रहार ५ व राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, लढा १, बसप १ अशा एकू ण २५ सदस्य संख्येवर हा गाडा सध्या थांबला आहे. सत्तास्थापनेसाठी ३० ची ‘मॅजिक फिगर’ आवश्यक आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त सदस्य काँग्रेस व मित्रपक्षांकडे आहेत. त्यामुळे भाजपने सत्तेसाठी कितीही आटापिटा केला तरी ते जादुई आकडा गाठू शकत नाहीत. भाजपने इतर सदस्यांना खेचून आणण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्यात. मात्र, फारसे यश आले नाही. सध्या तरी सत्तेचा चेंडू काँग्रेसच्या गोटात आहे. सध्या काँग्रेसचे २६, रिपाइं १, राकाँ २, शिवसेना ३ आणि अपक्ष २ अशा एकूण ३४ सदस्य एकत्रीतपणे सहलीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेसची बाजू भक्कम दिसत आहे. भाजपचा आकडा पाहता त्यांना सत्तेसाठी पाच ते सहा सदस्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे उलथापालथीची शक्यता दिसत आहे.