शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वाघांच्या स्थलांतरणाची नवी समस्या

By admin | Updated: February 3, 2017 00:13 IST

व्याघ्र प्रकल्पांमध्येच वाघांचे अस्तित्व, अधिवास असल्याचा समज आता वाघांनी मोडून काढला आहे.

चालण्याचा वेग वाढला : वाघाने कापले २०० किलोमीटरचे अंतर गणेश वासनिक  अमरावतीव्याघ्र प्रकल्पांमध्येच वाघांचे अस्तित्व, अधिवास असल्याचा समज आता वाघांनी मोडून काढला आहे. अनेक व्याघ्र प्रकल्पांमधून शेकडो किलोमीटरचा पल्ला गाठून ते नवा घरोबा शोधत असल्याने ही नवीन समस्या निर्माण झाली आहे. तसेच वाघांच्या चालण्याचा वेग वाढल्याने हा संशोधनाचा विषय ठरला आहे.देशात ४९ व्याघ्र प्रकल्पांमध्ये २० टक्के व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या ८० टक्क्यांच्या घरात आहे. यात राज्यातील पेंच, ताडोबा, नवेगाब बांध, नागझिरा, मेळघाट तर मध्यप्रदेशातील कान्हा, पन्ना, पेंच आसामातील मानस, वाल्मिकी, राजस्थानच्या रणथंबोर या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांच्या संरक्षणासाठी जागा अपुरी पडत असल्याने स्थलांतरणाच्या घटना निदर्शनास येत आहेत. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने देशभरातील व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रसंचालकांना सूक्ष्म लक्ष देण्याचे निर्देश दिले होते. राज्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ मेळघाटपेक्षाही कमी असले तरी ताडोबातून वाघांचे स्थलांतर अधिक प्रमाणात होते. ताडोब्यातून गडचिरोली, मध्यप्रदेश, तेलंगणाच्या सीमा ओलांडून वाघ स्थलांतर करीत आहेत.२०१० मध्ये कान्हा व्याघ्र प्रकल्पातून एका वाघाने २०० कि.मी.चे अंतर ओलांडून मध्यप्रदेशातील पेंचमध्ये विसावा घेतला होता तर १५० किलोमीटर प्रवास करून कळमेश्वरचा वाघ पोहरा, चिरोडी जंगलात रमला आहे. टिपेश्वर अभयारण्यातील वाघ अदिलाबाद, आंध्रप्रदेश, तेलंगणापर्यंत ये-जा करीत असल्याचा अहवाल वन्यजीव विभागाने राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाला दिला आहे. मध्यप्रदेशातील पेंच, कान्हा व पन्नामधील वाघ छिंदवाडा, शिवनी भागात रमले आहेत. परिणामी व्याघ्रांचे स्थलांतरण का वाढले, याचा शोध घेणे गरजेचे ठरणार आहे. स्थलांतरित वाघांना त्यांच्या घरी सोडणार कसे?स्थलांतरित वाघांना पुन्हा त्याच व्याघ्र प्रकल्पात सोडण्याबाबतचे राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे आदेश आहेत. मात्र स्थलांतरित वाघ कसे, कोठे शोधावेत, हा प्रश्न व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रसंचालकांसमोर निर्माण झाला आहे. स्थलांतरित वाघ ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर त्यांना पकडण्याची नवी समस्या निर्माण झाली आहे.