शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

३१ गावांना मिळणार नवीन पोलीस पाटील

By admin | Updated: September 17, 2015 00:18 IST

गावात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी याकरिता प्रशासन व गावकरी यांच्यातील महत्त्वाची भूमिका...

चांदूरबाजार : गावात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी याकरिता प्रशासन व गावकरी यांच्यातील महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस पाटीलपदाची भरती प्रक्रिया ११ सप्टेंबर रोजी पूर्ण झाली. तालुक्यातील ३१ गावांमधील पोलीस पाटलांच्या पदभरतीसाठी उपविभागीय कार्यालय अचलपूर येथे ही प्रक्रिया संपूर्ण नियमावलीनुसार कार्यान्वित झाली आहे. तालुक्यातील वडुरा, इमामपूर, लाखनवाडी, कोदोरी, आखदवाडा, दत्तापूर, जसापूर, निंभोरा, बऱ्हाणपूर, सैदापूर, तळवेल, परसोडा, बोराळा, शहापूर जवळा, दहिगाव, कोंडवर्धा, चिंचोली, बेलोरा तुळजापूर, बोरगाव मोहना, कुरळ, ब्राम्हणवाडा पाठक, बोदड, गोविंदपूर, जालनापूर, निमखेड, खेल चौधर, खेल खुशाल व खरपी या गावांच्या पोलीस पाटीलपदाच्या निवड प्रक्रियेचा जाहिरनामा २४ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध झाला आहे.या पदासाठीची शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण असून वयोमर्यादा २५ ते ४५ वर्षे आहे. अर्जदार हा ग्रामपंचायत सदस्य नसावा किंवा पूर्णवेळ नोकरी करणारा यासह अनेक शर्ती व अटी पोलीस पाटीलपदाकरिता ठेवण्यात आल्या आहेत. जाहिरनाम्यासह प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. अर्जाच्या छाननीनंतर उमेदवारांची ८० गुणांची लेखी परीक्षा प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत ४५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. त्यानंतर प्रथम तीन उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावण्यात येईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची तोंडी परीक्षा समितीमार्फत घेण्यात येणार आहे. तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांपैकी मयत अथवा सेवानिवृत्त पोलीस पाटलांचे वारसास प्राधान्य देण्यात येणार आहे.पोलीस पाटलांच्या ३१ पदांपैकी १३ पदे खुल्या प्रवर्गासाठी तर चार पदे खुल्या महिला पदासाठी राखीव आहेत. इतर मागासवर्गाकरिता ४ पदे याच वर्गातील महिलांकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती महिलासाठी दोन पदे, विमुक्त जाती अ प्रवर्गासाठी तीन, अनुसूचित जाती एक, भटक्या जमाती 'क' १ व भटक्या जमाती 'क' महिलासाठी एक जागा याप्रमाणे सर्व पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत.प्राप्त अर्जांची छाननी २३ सप्टेंबरला होणार असून ४ आॅक्टोबरला या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. १९ आॅक्टोबर रोजी निकालाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया उपविभागीय अधिकारी तथा पोलीस पाटील निवड समितीचे अध्यक्ष श्यामकांत म्हस्के यांच्या नियंत्रणाखाली पार पडत आहे. (शहर प्रतिनिधी)