शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मक्यावर नवीन लष्करी अळींचा अटॅक, खरिपासाठी धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:37 IST

मका पिकावर नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत आहे. या किडीचे मूळस्थान संयुक्त संस्थाने (यू.एस.ए.) ते अर्जेन्टिना या उत्तर व दक्षिण अमेरिका खंडातील आहे. मात्र धान्याच्या आयात-निर्यातीतून पतंगाद्वारे स्थलांतरणातून ही कीड आली असावी, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसमोर नवे संकट : एकात्मिक व्यवस्थापन महत्त्वाचे, कृषी शास्त्रज्ञांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मका पिकावर नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत आहे. या किडीचे मूळस्थान संयुक्त संस्थाने (यू.एस.ए.) ते अर्जेन्टिना या उत्तर व दक्षिण अमेरिका खंडातील आहे. मात्र धान्याच्या आयात-निर्यातीतून पतंगाद्वारे स्थलांतरणातून ही कीड आली असावी, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. भारतात मे २०१८ मध्ये कर्नाटक राज्यात या लष्करी अळीची नोंद झाली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये सोलापूर जिल्ह्यात त्यानंतर नांदेड, हिंगोली व आता बुलडाणा जिल्ह्यातील मक्यावर या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. ही अळी या खरीप हंगामासाटी नवे संकट असल्याने एकात्मिक व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याची माहिती प्रादेशिक संशोधन केंद्र येथील कीटकशास्त्रज्ञ डॉ.अनिल ठाकरे यांनी दिली.ओळखपतंग : या पतंगाचे समोरील पंख करड्या व तपकिरी रंगाचे असून पंखाच्या टोकाकडे आणि मध्यभागी पांढरे ठिपके असतात. या पतंगाचे मागील पंख चमकदार पांढरे असतात. ती निशाचर असून संध्याकाळी मिलनासाठी जास्त सक्रिय असतात.अंडी : पूर्ण वाढलेली अळी ३.१ ते ३.८ सेंमी लांब असते. अळीचा रंग फिक्कट हिरवा ते जवळपास काळा असतो. पाठीवर फिक्कट पिवळ्या रंगाचा तीन रेषा असतात. डोक्यावर उलट्या इंग्रजी ‘वाय’ आकारासारखे चिन्ह असते. कडेने लालसर तपकिरी पट्टा, शरीरावर काळे ठिपके असतात.कोष : कोष लालसर तपकिरी रंगाचे असतात.निरीक्षणे : अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मका पिकात दिसून आला. ही किड सहजपणे ओळखायची लक्षणे म्हणजे किडीच्या डोक्यावर उलट ‘वाय’ आकाराची खुण दिसून येते. तिच्या शरीराच्या (पोटाच्या) आठव्या सेगमेंटवर चार काळ्या रंगाचे ठिपके चौकोणी आकारात दिसून येतात. शरीराच्या वरच्या बाजूस फोड आल्यासारखे (उंचवट्यासारखे) काळे ठिपके दिसून येतात. त्यामध्ये लाल काळ्या रंगाचे केस दिसून येतात. पोंग्याच्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव असल्यास पानावर एका रांगेत छिद्रे दिसतात.नुकसानीचा प्रकार :- या किडीची अळी अवस्था पिकांना नुकसान पोहचविते. सुरूवातीच्या अवस्थेतील अळ्या पानाचा हिरवा भाग खरडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे चट्टे दिसतात. मोठ्या अळ्या पाने कुरतडून खातात. त्यामुळे पानांना छिद्रे दिसतात. अळी पोंग्यामध्ये शिरून आतला भाग खाते. पानाला छिद्रे व पोंग्यामध्ये अळीची विष्ठाही चिन्हे या अळीच्या प्रादुर्भावाची लक्षणे आहेत. या किडीच्या प्रादुर्भावामुळे ३० ते ६० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येते.खाद्य वनस्पती : ही बहुभक्षी कीड आहे. ही कीड ८० च्यावर तृणधान्ये, तेलवर्गीय व भाजीपाला पिकावर उपजिविका करते. या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मका, भात, ज्वारी, ऊस व बर्मुडा गवतावर होतो. याशिवाय सोयाबीन, कापूस, भुईमूग, कांदा, टोमॅटो, कोबीवर्गीय, भाजीपाला, भोपळा वर्गीय भाजीपाला इत्यादी पिकांवर उपजिविका करते.कीटकनाशकेसर्वेक्षणाअंती सरासरी ५ टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळल्यास १० लिटर पाण्यात डायमेथोएट ३० टक्के १२.५ मिली. किंवा थायमेथोक्झाम १२.६ टक्के + लॅम्बडासायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेडसी २.५ मिली किंवा क्लोरॅनट्रॅनिलीप्रोल १८.५ टक्के एस.सी. ३.०० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कार्बोफ्यूरॉन ३ टक्के दाणेदार सीजी ३३ किलो प्रति हेक्टरी प्रमाणे जमिनीत ओलावा असताना फेकीव पद्धतीने वापर करून दाणे जास्तीत जास्त पोंग्यामध्ये पडेल याची काळजी घ्यावी.असे करावे व्यवस्थापनजमिनीची खोल नांगरणी करावी, पतंगावर पाळत ठेवण्यासाठी प्रकाश सापळे व कामगंध सापळ्याचा पोंगे धारण अवस्थेत ठेवावे, प्रादुर्भावासाठी दोन वेळा सर्वेक्षण करावे, यासाठी शेतातील पाच ठिकाणचे मक्याचे २० झाड किंवा १० ठिकाणचे १० झाडे शेताचे प्रतिनिधीत्व करतील अशी निवडावीत, ट्रायकोग्रामा प्रजाती, टेलेनोमस रेमस या परोपजीवी कीटकांची एकरी ५० हजार अंडी याप्रमाणे शेतात सोडावे, त्यानंतर ४ ते ५ दिवसापर्यंत रासायनिक किटकनाशकाची फवारणी करू नये, अंडीपूंज व अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात, ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, बॅसीलस थरिंजिएसीस २० ग्रॅम किंवा नोमुरिया रीलै किंवा मेटायझियम अनियोली ४० ग्रॅम १० लिटर पाणी याप्रमाणे जैविक किटकनाशकाची फवारणी करावी, केंद्रिय किटकनाशक बोर्डाने यावर्षीच्या हंगामाकरिता फॉल आर्मीवर्मच्या नियंत्रणाकरिता तात्पुरती शिफारस केलेली कीटकनाशके वापरावीत.विशेष लक्ष देण्याची गरज का?महाराष्ट्रात मका पिकावर ३५ टक्के सोबतच ज्वारीवर १० टक्के व उसावर ५ टक्क्यांपर्यंत प्रादुर्भावाची नोंद आहे. (चोरमुले, २०१९), बहुभक्षी किड (८० च्यावर वनस्पतीवर) उपजिविका करते. प्रसार होण्याचा खूप जास्त (पतंग अंडी देण्याअगोदर वेग ५०० किमीपर्यंत जाऊ शकतात. वाºयाचा वेग अनुकूल असल्यास ३० तासांत १६०० किमीपर्यंत गेल्याची नोंद आहे.) (रोजे आणि सहकारी १९७५), वर्षभर जीवनचक्र चालू राहते. (सोयाबीन, कापूस, भात सोबत एकूण ८० हून अधिक पिकेदेखील या किडीचे यजमान पिके असल्याने येणाºया काळात या किडीचा प्रादुर्भाव सर्वदूर दिसण्याची शक्यता आहे. अमेरीकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव ऊस पिकात दिसून आला. आजपावेतो या किडीचा प्रादुर्भाव फुटव्याच्या अवस्थेत असणाºयास ऊस पिकावर झाल्याचे निदर्शनास आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती