शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नवीन खोलापुरी गेट ठाणे धूळखात

By admin | Updated: January 30, 2017 01:15 IST

तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या खोलापुरी गेट पोलीस

लाखोंचा खर्च : पोलीस विभागाचे दुर्लक्ष, संरक्षक भिंत तुटली अमरावती : तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीला उतरती कळा लागली आहे. लाखोंचा खर्च करून ही इमारत बांधण्यास वर्ष उलटले. मात्र, आजही ती इमारत धूळखात पडली आहे. पोलीस विभागाचे या इमारतीकडे दुर्लक्ष होत आहे. इमारतीच्या सरंक्षणभिंतीचा एक कोपरा तुटला असून त्या भगदाडातून रहदारी देखील सुरु झाली आहे. इतकेच नव्हे तर परिसरातील नागरिकांनी ठाण्याच्या आवाराला पार्किंग झोन बनविले आहे. याकडे पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात हे पोलीस ठाणे मंजूर झाले होते. त्यानंतर या ठाण्याच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन तत्कालीन पोलीस आयुक्त अजित पाटील यांच्या कार्यकाळात झाले होते. पोलीस कल्याण निधीतून ३५ ते ४० लाख रूपये खर्च करून ठाण्याची नवीन इमारत बांधण्यात आली. मात्र, या इमारतीचे लोकार्पण झालेच नाही. परिणामी सद्यस्थितीत ही इमारत धूळखात पडली आहे. नवीन इमारत सुविधाजनक नसून तेथे महिला कक्ष नाही, फिर्यादीसाठी बसण्याची जागा नाही, बंदीगृह देखील नसल्याने ही इमारत कुचकामी ठरली आहे. उपरोक्त जागेवर पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी काही राजकीय नेत्यांद्वारे प्रचंड विरोध झाल्याने पोलिसांनीही या इमारतीची हवी तशी दखल घेतली नाही. त्यामुळे सध्या ही इमारत केवळ शोभेची वस्तू बनली आहे. या नवीन ठाण्याच्या आवारात नागरिकांची वाहने पार्क केली जात आहेत. पोलीस कल्याण निधीतील लाखोंची रक्कम या बांधकामासाठी गुंतवण्यात आली. मात्र, इमारत कोणत्याच उपयोगात आलेली नाही. पोलीस विभागाने तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे. खोलापुरी गेट ठाण्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम होऊन तीन वर्षे झालीत. मात्र, काही स्थानिक नेत्यांनी इमारतीला विरोध दर्शविला. त्यामुळे ठाण्याचे स्थांनातरण झाले नाही. वरिष्ठस्तरावर ठाण्याचा मुद्दा आहे. - अनिल कुरुळकर, पोलीस निरीक्षक, खोलापुरी गेट पोलीस ठाणे.