शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

खासदार राणांच्या निवासस्थानी नव्या पालकमंत्र्यांचे औक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:31 IST

अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवि राणा यांच्या गंगासावित्री सदन या निवासस्थानी रविवारी रात्री राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री आणि भावी पालकमंत्री अनिल बोंडे यांनी भेट दिली. अनिल बोंडे यांनी शहरात प्रविष्ठ होताच प्रथम भाजप पक्ष कार्यालय आणि त्यानंतर लगेच राणा दाम्पत्याचे घर गाठले. स्वत:च्या घरी जाण्यापूर्वी नामदार बोंडे यांनी सपत्निक राणा दाम्पत्याचे घर गाठण्याच्या कृतीला विशेष अर्थ प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देराजकीय गुपित काय? : बोंडेंनी स्वत:च्या घरापूर्वी गाठले गंगासावित्री सदन

अमरावती : अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवि राणा यांच्या गंगासावित्री सदन या निवासस्थानी रविवारी रात्री राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री आणि भावी पालकमंत्री अनिल बोंडे यांनी भेट दिली. अनिल बोंडे यांनी शहरात प्रविष्ठ होताच प्रथम भाजप पक्ष कार्यालय आणि त्यानंतर लगेच राणा दाम्पत्याचे घर गाठले. स्वत:च्या घरी जाण्यापूर्वी नामदार बोंडे यांनी सपत्निक राणा दाम्पत्याचे घर गाठण्याच्या कृतीला विशेष अर्थ प्राप्त झाला आहे.राजकीय सारीपाटावरील हा घटनाक्रम हल्ली जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या घटनेमुळे केवळ भाजप-सेनाच नव्हे तर महाआघाडीच्या नेत्यांचेही कान टवकारले आहेत. तसा दिसणारा हा स्वागताचा अगदी औपचारिक कार्यक्रम असला तरी याला मागील वर्षभरातील भाजपचे माजी पालकमंत्री व पदाधिकाऱ्यांच्या संघर्षाची किनार आहे. त्यामुळेच बोंडे यांची ही भेट अन् खा. नवनीत यांनी त्यांचे केलेले औक्षण जिल्ह्याच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवू शकेल. लोकसभेच्या धुमश्चक्रीत राणा दाम्पत्याविरुद्ध भाजप-सेनेने आगपाखड केली. नवनीत राणा निवडून येऊ नयेत यासाठी नुकतेच पायउतार झालेले पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली. मतदारांनी नवनीत राणा यांना खासदारपद बहाल केले. लागोलाग पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात मुख्यमंत्र्यांनी प्रवीण पोटे यांचे मंत्रिपद काढून घेतले. पोटेंच्याच जिल्ह्यातील बोंडेंना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद बहाल केले. या नव्या पालकमंत्र्यांनी पहिले काम केले ते नवनिर्वाचित खा. नवनीत आणि बडनेºयाचे आ. रवि राणा यांचे भाजपच्या लेखी असलेले मोल कृतीतून जाहीर करण्याचे!अनेकांना पोटशूळशेतकऱ्यांचा कैवार असलेला कृषिमंत्री अन् सर्वांना न्याय देणारा पालकमंत्री असल्याचे जाहीर करीत राणा दाम्पत्याच्या युवा स्वाभिमानने अनिल बोंडेंच्या शपथविधीनंतर शहरातील चौकाचौकांत आतषबाजी केली. ना.बोंडे यांनी निवासस्थानी भेट दिली त्यावेळीही राणा दाम्पत्याने दमदार आतषबाजी केली. ना. बोंडे यांनीही सपत्नीक स्वागताचा स्विकार करीत आमदार रवि राणा यांच्या आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले. यावेळी शेकडोंच्या संख्येने जमलेल्या युवा स्वाभिमान पदाधिकाºयांनी ना. बोंडेंचा जयघोष केला. दोघांमधील ही गट्टी भाजपातील काहींना पोटशूळ उठविणारी ठरली असली तरी त्यांच्याशीच कदमताल करण्याशिवाय अशा मंडळींना दुसरा पर्याय तरी कुठला?