शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नव्या ढंगात जुन्या गाण्यांची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 22:35 IST

येथील पहाट परिवारतर्फे हिंदू नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ पाडवा पहाटचा सांस्कृतिक कार्यक्रम रविवारी सकाळी सात वाजता सांस्कृतिक भवनात पार पडला.

ठळक मुद्दे'पहाट'चा बहारदार सांस्कृतिक उपक्रम

आॅनलाईन लोकमतअमरावती : येथील पहाट परिवारतर्फे हिंदू नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ पाडवा पहाटचा सांस्कृतिक कार्यक्रम रविवारी सकाळी सात वाजता सांस्कृतिक भवनात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला नववर्षाचे प्रतिक म्हणून अर्चना-हेमंत पवार या दाम्पत्याच्या हस्ते गुढीपूजन करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून आयुक्त हेमंत पवार, अनंत गुढे, सुरेखा लुंगारे, अनिल अग्रवाल आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाची केंद्रीय संकल्पना ‘हर दिल जो प्यार करेगा’ यावर बेतलेली होती. यामध्ये १९६० च्या दशकातील ‘कह दु तुम्हे या चुप रहु...’ यापासून तर १९६० च्या दशकातील उडत्या चालीची गाणी ‘लेकर हम दिवाना दिल...’ थेट अगदी आजच्या ताज्या दमाची सुद्धा सादर करण्यात आली. यामध्ये बाल कलावंत विनम्र काळे, मनोहरलाल, धनश्री बनसोड, रोमहर्षक बुजरुक, राजश्री पाटील, नव्या ढंगात जुनी गाणी सादर करण्यात वकुब असणारे कामिनी खैरे, श्रीकृष्ण चिमोटे यांनी रंगत आणली.वाद्य वदनात प्रिती मिश्रा, अभिषेक श्रीवास्तव यांनी आपली सुरेश गित सादर केलीत. सोबतच ज्योत्ना शेटे, शुभांगी देशमुख, चंद्रकांत पोपट, मनोहर शेगोकार, सुरेखा त्यागी, धर्माळे, रंजना मामर्डे, राजेश किल्लेकर, विरभान झामनानी यांनी रंगत आणली.नृत्य अविष्कारमध्ये बाल कलावंत सर्व वयोगटातील मंडळींनी एकल समूह तसेच जोडीदारांसह भाग घेतला. यामध्ये प्रीती बुजरूक, मिश्रा, किरण बनसोड, सुधीर मोरे, विक्रम मामर्डे, नितीन बोबडे, कविता विधळे, ओमप्रकाश, प्रतिमा मलीक्का जयस्वाल यांनी रंगत चढवली.एकल नृत्यात शीतल चौधरी, आशा हरवानी यांच्या लयबद्ध नृत्याने दिवंगत श्रीदेवी यांना श्रद्धांजली अर्पण केली. संचालन किरण बनसोड, कविता विधळे, मोनिका उमक यांनी केले. तसेच नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी नितीन अबुदानी यांनी सांभाळली.