शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

सायन्सकोर बनले नवे डम्पिंग ग्राऊंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:40 IST

स्थानिक आमदार सुनील देशमुख यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सायन्सकोर मैदानाला महापालिकेने सध्या डम्पिंग ग्राऊंड बनविले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील व अगदी बसस्थानकालगत असलेले सायन्सकोर मैदान शहराचे वैभव म्हणून ओळखले जाते.

ठळक मुद्देचार प्रभागांतील कचरा : विलगीकरण स्थळ नेमके कुठे?

इंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक आमदार सुनील देशमुख यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सायन्सकोर मैदानाला महापालिकेने सध्या डम्पिंग ग्राऊंड बनविले आहे.महानगरपालिका क्षेत्रातील व अगदी बसस्थानकालगत असलेले सायन्सकोर मैदान शहराचे वैभव म्हणून ओळखले जाते. हे मैदान अवाढव्य असल्याने तेथे दिग्गज नेत्यांच्या सभांव्यतिरिक्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मैदानाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे आहे. कुठलेही कार्यक्रम येथे घेण्यापूर्वी जिल्हा परिषदेत रीतसर पावती फाडून परवानगी घेतली जाते. हे मैदान वैशिष्ट्यपूर्ण असल्याने शहराची शान मानली जाते. मात्र, काही दिवसांपासून शहरातील चार प्रभागांतील रोज निघणारा कचरा या मैदानात आणून टाकला जात आहे. यासाठी १२ हायड्रोलिक आॅटोंचा वापर होत आहे. तेथे जमा झालेला कचरा काही वेळाने वलगाव येथील कचरा विलगीकरण स्थळी मोठ्या वाहनांनी पोहचविले जाते, अशी माहिती स्वच्छता कामगारांनी दिली. तथापि, वलगाव येथे कचरा विलगीकरण स्थळ नेमके कुठे, याचे उत्तर त्याला देता आले नाही.शहरातील विविध प्रभागातील कचरा ओला व सुका असा स्वतंत्ररीत्या संकलित करून तो प्रभागातील कंटेनरमध्ये वेगवेगळा टाकावा व त्यानंतर कंत्राटदाराने तो वेगवेगळा केलेला कचरा त्यांच्या ट्रकमधून ओला व सुका असाच स्वतंत्ररीत्या सुकळी कम्पोस्ट डेपोवर घेऊन जावा, अशी कचरा संकलन व वहनाची पद्धत आहे. त्यासाठी महापालिकेचे स्वतंत्र धोरणसुद्धा आहे. महापालिकेचा स्वच्छता विभाग त्या धोरणाला तिलांजली देत असल्याचा प्रकार सायन्सकोरवर नव्याने बनत असलेल्या डम्पिंग ग्राऊंडच्या निमित्ताने उघड झाला आहे.नागरिकांना दुर्गंधीचा त्रासबसस्थानक परिसरातून दररोज सकाळी हजारो नागरिक ये-जा करतात. रुख्मिणीनगर बाजूलाच असल्याने प्रतिष्ठितांसह मालटेकडीवर फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सकाळपासूनच मैदान कचरा टाकण्यास सुरुवात होते. वराह कचºयावर ताव मारत असल्याने तो विखुरला जातो.अधिनस्थ यंत्रणेला विचारणा करू. सायन्सकोर मैदान जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहे. तेथे कचरा टाकण्यासंदर्भात जिल्हा परिषदेशी कुठलाही करार करण्यात आलेला नाही.- डॉ. विशाल काळेवैद्यकीय आरोग्य अधिकारी महापालिकाकचरा पारधी बांधवांकडून पन्नी वेचण्याकरिता, वराहांद्वारा विखुरला जातो. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन होऊन आजाराला निमंत्रण मिळत आहे. यावर संबंधितांसह नागरिकांनी नियंत्रण आणणे गरजेचे आहे.- डॉ. अतुल यादगिरे कर्करोगतज्ज्ञ

महापालिकेने परवानगी मागितलेली नाही. ती आम्ही दिलीही नसती. हा प्रकार थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांशी वारंवार पत्रव्यवहार केला. अखेर सिटी कोतवाली ठाण्यात तक्रारसुद्धा दिली आहे.- जयंत देशमुखसभापती, शिक्षण, जिल्हा परिषद

टॅग्स :dumpingकचरा