शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

पोहरा-चिरोडी तरुणाईचे नवे ‘डेस्टिनेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 22:52 IST

वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे प्रेमीयुगलांना एकांत शोधण्यासाठी जंगलाचा आधार घ्यावा लागतो. प्रेमाचे दोन शब्द बोलावे, आपल्या जिवलगासोबत चार क्षण घालवावे या विचारात हे प्रेमीयुगुल पोहरा बंदी, चिरोडीचे जंगल आणि मालखेड पर्यटन स्थळाचा आधार घेतात.

ठळक मुद्देअश्लीलता वाढली : प्रेमीयुगुलांचा सुळसुळाट, अपघाताचे प्रमाणही वाढले

अमोल कोहळे।आॅनलाईन लोकमतपोहरा बंदी : वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे प्रेमीयुगलांना एकांत शोधण्यासाठी जंगलाचा आधार घ्यावा लागतो. प्रेमाचे दोन शब्द बोलावे, आपल्या जिवलगासोबत चार क्षण घालवावे या विचारात हे प्रेमीयुगुल पोहरा बंदी, चिरोडीचे जंगल आणि मालखेड पर्यटन स्थळाचा आधार घेतात. या दोन्ही ठिकाणी गेलेल्या अनेक तरूणींच्या आयुष्याचा रंगच उडाला आहे. या जंगलात वावरणाऱ्या हीन प्रवृत्तीच्या काही नरपशूंच्या वासनेला व विकृत मनोवृत्तीला या तरूणी बळी पडल्या असून या प्रकाराची कुठेही वाच्यता करण्याची हिंमत त्या करीत नाहीत.पोहरा व चिरोडी, मालखेड पर्यटन स्थळी मुलींचे त्यांच्या मित्रांसोबत प्रेमचाळे सुरू असतात. यामध्ये सुसंस्कृत घरातील मुलींचाही समावेश असतो. या दोन्ही ठिकाणी आलेल्या एकांताची संधी साधून अमरावती-चांदूररेल्वे महामार्गावर प्रेमीयुगुलांचा राबता दिवसेंदिवस वाढतच आहे. पोहरा-चिरोडी घाटामध्ये चालत्या वाहनांवर करीत असलेले अश्लील चाळे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहेत. काही पालकांचे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. प्रेमी युगुलांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक दिसत आहे. पालकांसाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे.भरकटलेली तरूणाईशाळा-महाविद्यालयांमधून आपल्या मित्रांसोबत दुचाकीवर तोंडाला दुपट्टा बांधून शहरवासीयांची नजर चुकवीत अनेक तरूण चांदूररेल्वे मार्गाने फिरताना दिसतात. दुपारभर मौज करून महाविद्यालयाचा वेळ संपल्यावर त्या तरूणी आपल्या घराच्या दिशेने वळतात. मुले कुठे गेली याचे भान पालकाला राहत नाही. त्यामुळे पालकांनीसुद्धा सजगता बाळगणे ही काळाची गरज झाली आहे.रविवारी सर्वाधिक धूमशाळा-महाविद्यालयाच्या नावावर विद्यार्थी-विद्यार्थिनींना मित्रांसमवेत ‘लाँग ड्राईव्ह’ करतात. पोहरा-चिरोडीमार्गावरील निसर्गरम्य सत्याग्रही घाटात युगुलांचे जत्थेच्या जत्थे दृष्टीस पडतात. रविवार व सुट्टीच्या दिवशी घाटातील काही पॉर्इंटवर माना शरमेने खाली घालण्यास लावणारे दृश्य दिसते.प्रतिबंध आवश्यकयाच घाटात प्रेमीयुगुलांची अनेकदा छेडखानी झाली. यावर वेळीच प्रतिबंध घातला नाही तर गंभीर प्रकाराला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. सकाळपासून सायंकाळच्या सात वाजेपर्यंत असला प्रकार या मार्गावर आढळते. याआधी तर काही चारचाकी वाहने रस्त्याच्या कडेला लावून बसत असल्याचे दिसून आले होते.जंगलात हिंस्त्र पशूप्रेमीयुगुल बेभान फिरताना दिसतात. पोहरा-चिरोडी जंगल हे शहरातील प्रेमीयुगुलांकरिता मनमोकळे रान ठरत असल्याने या जंगलात प्रेमीयुगुलांची गर्दी वाढत आहे. एकांतवास मिळण्याच्या दृष्टीने झाडाझुडपांच्या आडोशात बसणाºया प्रेमीयुगुलांच्या मनात जंगलात पट्टेदार वाघ सुटल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.