शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
2
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
3
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
4
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
5
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
6
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
7
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
8
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
9
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
10
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
11
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
12
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
13
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
14
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
15
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
16
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
17
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
18
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
20
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?

नव्या सीपींना दुचाकी चोरट्यांची सलामी !

By admin | Updated: January 16, 2016 00:10 IST

मागील सहा महिन्यांपासून दुचाकी चोरट्यांनी मांडलेल्या उच्छादाने अमरावतीकर हैराण झाले आहेत. दुचाकी घेऊन बाहेर पडलेल्या प्रत्येकाला वाहनाच्या सुरक्षिततेची चिंता सतावू लागली आहे.

चोर निर्ढावले : एकाच दिवशी सात वाहने लंपासप्रदीप भाकरे अमरावतीमागील सहा महिन्यांपासून दुचाकी चोरट्यांनी मांडलेल्या उच्छादाने अमरावतीकर हैराण झाले आहेत. दुचाकी घेऊन बाहेर पडलेल्या प्रत्येकाला वाहनाच्या सुरक्षिततेची चिंता सतावू लागली आहे. २४ तासांत तब्बल ८ दुचाकी चोरीच्या घटनांची झालेली नोंद निर्ढावलेल्या दुचाकी चोरट्यांनी नव्या पोलीस आयुक्तांना दिलेली सलामीच आहे, असे म्हटल्यास गैर ठरू नये. अमरावतीची जनता ‘त्राही माम्’ करीत नवनियुक्त पोलीस आयुक्तांकडून दुचाकी चोरट्यांवर अंकुश लावण्याची आस धरून आहेत. १ ते १४ जानेवारी या कालावधीत तब्बल २९ दुचाकी चोरीला गेल्या आहेत, यावरून या प्रकाराचे गांभीर्य लक्षात येईल. सुमारे ८ लाख लोकसंख्या आणि १० पोलीस ठाण्यांचा आवाका असलेल्या शहर पोलिसांचे ‘मुखिया’ म्हणून शुक्रवारी दीर्घानुभवी दत्तात्रेय मंडलिक यांनी ‘चार्ज’ घेतला. पहिल्याच दिवशी त्यांनी लोकाभिमुख प्रशासनाची ग्वाही दिली असली तरी अमरावतीचे पोलिसिंग त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे, हे विशेष.पोलीस यंत्रणेला छेद !शहर आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्रकालीन गस्त, संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी- कर्मचारी, गुन्हे शाखा, डीबीस्कॉड, सीआर मोबाईल, चार्ली कमांडो, खुफियांसह प्रमुख चौकात सेवा देणाऱ्या १५४ वाहतूक पोलिसांचा ताफा तैनात असतो. ‘रिस्पॉन्स टाईम’ कमी करण्यासाठी खास ‘सीआर मोबाईल’ गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या पाठपुराव्याने शहर आयुक्तालयाला मिळाल्यात. रात्रकालीन गस्त आणि साध्या वेशातील पोलिसिंगचा दावाही केला जातो. तथापि एवढा व्यापक ताफा असूनही मुठभर दुचाकी चोरटे पोलीस यंत्रणेला छेद देतात. मग पोलीस करतात तरी काय, असा प्रश्न नागरिकांना पडतो.