शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत रुग्णांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:11 IST

अरुण पटोकार फोटो पी २२ पथ्रोट पथ्रोट : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनांतर्गत साकारली गेली. ...

अरुण पटोकार

फोटो पी २२ पथ्रोट

पथ्रोट : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनांतर्गत साकारली गेली. त्यासाठी ५ कोटी ६० लक्ष रुपयांचा निधीदेखील खर्च करण्यात आला. जुनी इमारत पाडून नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले. मात्र, ती पांढरा हत्ती ठरली आहे. आता पावसाळ्याचे दिवस पाहता नवीन इमारतीतून कामकाज सुरू व्हावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. साधनसामग्री व वीजपुरवठा करून नवीन इमारतीतून आरोग्य सेवा बजावावी, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

येथील पीएचसीत दोन वर्षांपासून एकही प्रसूती झालेली नाही. रात्री-अपरात्री तालुक्याच्या ठिकाणी महिलांना प्रसूतीकरिता नेण्यात येत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागतात. १५ बाय १५ च्या खोलीत आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांवर उपचार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खोलीत कर्मचाऱ्यांना बसायलासुद्धा जागा नाही. रुग्ण तपासणीकरिता योग्य टेबलही नाही. त्यात एखाद्या रुग्णाला सलाईन द्यायची असल्यास जागेअभावी तासभर थांबावे लागत असून, पिण्यासाठी पाणीदेखील नाही. रुग्णांसाठी खाट नाही. महिला कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रसाधनगृह इतर भौतिक सुविधा नसल्याने अडीच वर्षांपासून कर्मचाऱ्यांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पावसाळ्यात या खोलीत पाणी गळते. तसेच या खोलीच्या बाजूला टिनाच्या छताखाली असलेला औषधीचा साठासुद्धा पावसाळ्यात भिजत असल्याचे चित्र दोन वर्षांत दिसून आले.

४६ गावांशी निगडित

पथ्रोट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत परिसरातील ४६ गावे निगडित आहेत. एक ते दीड लाखांच्या घरात ही लोकसंख्या आहे. लहान मुलांना लस देण्याकरिता वेगळा कक्ष, रक्त तपासणी कक्ष, गरोदर तपासणी कक्ष, वैद्यकीय अधिकारी कक्ष, आरोग्य कर्मचारी कक्ष अशा सर्व सुविधा नवीन इमारतीत झाल्या आहेत. फर्निचर व अन्य लहान कामांसह साधनसामग्री त्वरित आणाव्यात व पीएचसीचे काम नवीन इमारतीतून व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.