शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य संस्थांमधून न्यू बॉर्न स्क्रीनिंग, आजारी नवजात मुलांची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 17:04 IST

नवजात बालकांमध्ये आढळून येणाऱ्या कंजेनाइटल हायपोथायरोइडिजम व कंजेनाइटल अ‍ॅड्रेनल हायपरप्लाशिया या गंभीर आजारांच्या अटकावासाठी न्यू बॉर्न स्क्रीनिंग केले जाणार आहे.

- प्रदीप भाकरेअमरावती : नवजात बालकांमध्ये आढळून येणाऱ्या कंजेनाइटल हायपोथायरोइडिजम व कंजेनाइटल अ‍ॅड्रेनल हायपरप्लाशिया या गंभीर आजारांच्या अटकावासाठी न्यू बॉर्न स्क्रीनिंग केले जाणार आहे. नवजात बालकांची ही तपासणी राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमधून करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे.राज्यात प्रतिवर्षी अंदाजे २० लाख बालके जन्माला येतात. एसआरएस २०१६ नुसार राज्याचा अर्भक मृत्युदर १९ व नवजात मृत्युदर १३ आहे. परंतु, होणा-या एकूण बालमृत्यूपैकी ७० टक्के हे नवजात बालकांचे होत असल्याने नवजात बालकांची वेळेत तपासणी व निदान होऊन उपचार घेणे गरजेचे असल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य विभागाने नोंदविले आहे. नवजात बालकांमध्ये कंजेनाइटल हायपोथायरोइडिजम व कंजेनाइटल अ‍ॅड्रेनल हायपरप्लाशिया या गंभीर आजारांची शक्यता अधिक असते. असे आजार झालेल्या मुलांची तपासणी न्यू बॉर्न स्क्रीनिंग करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार केंद्र शासनाने सन २०१६-१७ मध्ये नवजात बालकांची राज्यातील आरोग्य संस्थांमधून तपासणी करून घेण्यास परवानगी दिली आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारने यंदा त्यासाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या मंजूर अनुदानातून राज्यातील नवजात बालकांची उपयुक्त तंत्रज्ञानाचा उपयोग करून तपासणी करून घेण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अशी तपासणी करताना लागणारी साहित्य व उपकरणांसाठी हा निधी देण्यात आला आहे. अत्यावश्यक साहित्य, उपकरणाची खरेदी आरोग्य संस्थांना यातून करता येईल.काय आहे कंजेनाइटल हायपोथायरोइडिजम?कंजेनाइटल हायपोथायराइडिजमचे निदान झाल्यास बाळाला थायरॉइड हार्मोन्सच्या बदलावर उपचार सुरू केले जातात. जन्मानंतर लगेचच निदान झाल्यास मेंदूला होणारे नुकसान टाळता येऊ शकते. हायपोथायरायडिजमग्रस्त अनेक मुलांना थायरॉइडचे हार्मोन्स संपूर्ण आयुष्यभर घ्यावे लागतात.काय आहे कंजेनाइटल अ‍ॅडनेरल हायपरप्लाशिया?कंजेनाइटल अ‍ॅड्रेनल हायपरप्लाशिया हा एक आनुवांशिक स्थितीचा संग्रह आहे. हार्मोन बनण्याच्या प्रक्रियेला मर्यादित करून अ‍ॅड्रेनल ग्रंथी कोर्टिसोलचे उत्पादन करू शकत नाही. हा आजार मुलांची सामान्य वाढ आणि विकासात अडसर निर्माण करतो.

टॅग्स :Amravatiअमरावती