शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

सर्वच बँकांमध्ये नवीन चलनाचे व्यवहार सुरळीत

By admin | Updated: November 11, 2016 00:29 IST

केंद्र शासनाने मंगळवारी मध्यरात्रीपासून देशात ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.

जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी : आजपासून एटीएमवर नवीन नोटाअमरावती : केंद्र शासनाने मंगळवारी मध्यरात्रीपासून देशात ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये नवीन चलनाचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे. निर्देशानुसार ग्राहकांना जुन्या नोटा बदलून नवीन चलन देणे, जुन्या नोटा डिपॉझिट म्हणून स्वीकारणे आणि मर्यादेनुसार त्यांना पेमेंट देण्यासाठी जादा काऊंटर उघडलेले आहेत. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी गुरुवारी स्टेट बँकेच्या शहरातील कँप शाखेत व श्याम चौकातील मुख्य शाखेला भेट देऊन पाहणी केली. बँक व्यवस्थापकांना आवश्यक निर्देश देऊन ग्राहकांना योग्य सोयी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यांच्यासमवेत पोलीस उपायुक्त आयुक्त विवेक पानसरे उपस्थित होते. शहरातील कँप शाखेतील सहायक महाप्रबंधक रमेशकुमार सिंह यांनी जिल्हाधिकारी गित्ते व पोलीस उपायुक्त पानसरे यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेतील गर्दीत ग्राहकांशी चर्चा केली. बँकेकडून स्वतंत्रपणे एक्सचेंजसाठी व डिपॉझिट, पेमेंट तथा शासकीय पेमेंटसाठी स्वतंत्र चार काऊंटर सुरू केले आहेत. दोन हजार रुपयांचे नवीन चलन ग्राहकांना देण्यात येत आहेत. ११ नोव्हेंबरपासून एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. सद्य:स्थितीत १०० रुपयांच्या नोटांचा तुटवडा लक्षात घेता एटीएमवर १०० रुपयांच्या नोटा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती सहाय्यक महाप्रबंधक रमेशकुमार सिंह यांनी जिल्हाधिकारी गित्ते यांना दिली. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाम चौकातील मुख्य शाखेला जिल्हाधिकारी गिते यांनी भेट देऊन पाहणी केली. तेथेही मोठ्या रांगा दिसून आल्यात. सर्व व्यवहार शांततेत चालू ठेवावेत, कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही तसेच व्यवस्थेचा दुरुपयोग होणार नाही , याची बँक प्रशासनाने काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांनी दिल्यात. (प्रतिनिधी)