शहरं
Join us  
Trending Stories
1
४ टक्के वाढू शकतो कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता; मोदी सरकार देऊ शकते मोठं गिफ्ट
2
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
3
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
4
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
5
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
6
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
7
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
8
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
9
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
10
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
11
कंत्राटे, टेंडर्सच्या मागे लागू नका; मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला
12
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
13
कार आणि मोटारसायकलच्या टायरमध्ये हवा कमी ठेवण्याचे ४ मोठे नुकसान, अपघाताचाही धोका!
14
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; सेन्सेक्स ७० अंकांनी वधारला, मेटल-ऑटो शेअर्समध्ये घसरण
15
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
16
महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?
17
Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित
18
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
19
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
20
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 

गोपनीय अहवालासाठी नवीन मूल्यमापन पद्धत

By admin | Updated: June 15, 2014 23:17 IST

जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे गोपनीय अहवाल आता वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहिले जाणार आहेत. यासाठी नावीन्यपूर्ण अशी मूल्यमापन पद्धती तयार करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना आता परीक्षेसारखे गुणांकनाला

अमरावती : जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे गोपनीय अहवाल आता वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहिले जाणार आहेत. यासाठी नावीन्यपूर्ण अशी मूल्यमापन पद्धती तयार करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना आता परीक्षेसारखे गुणांकनाला सामोरे जावे लागणार आहे. राज्यात अशा प्रकारे वेगळी पद्धत वापरली जात आहे. होय, नाही अशा पद्धतीला संपूर्णपणे फाटा देत शंभर गुणांची एकप्रकारे परीक्षाच घेतली जाणार आहे.यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात नवीन शिक्षक मूल्यमापन पद्धती तयार करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्षात शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी आणि इतर कर्मचारी वा अधिकारी यांचा गोपनीय अहवाल शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी तयार करीत असतात. दरवर्षीच्या प्रमाणे यात होय किंवा नाही असे पर्याय असते. परंतु यातील क्लिष्टता दूर करुन नवीन शिक्षक मूल्यमापन पद्धती अमलात आणण्याचे धोरण जिल्हा परिषदेत सुरु आहे. यासाठी शिक्षक स्वयंमूल्यमापन पद्धत शंभर गुणांची ती राहणार आहे. संबंधित शिक्षकांनी दिलेली प्रश्नावली भरुन द्यावी लागणार आहे. विविध मुद्दे यात राहतील. यात शिक्षक व्यक्तिमत्त्वाला २५ गुण देण्यात येणार अहेत. तसेच इतर ७५ गुण विविध वर्ग अध्यापनासह शालेय उपक्रमाचा यात सहभाग राहणार आहे. शिक्षकाने शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणले का तसेच वर्ग अध्यापनात नवोपक्रम विषयज्ञान कितपत आहे याची माहिती घेतली जाणार आहे. शिक्षकाने अहवाल भरल्यानंतर केंद्रप्रमुख किंवा वरिष्ठ अधिकारी त्याची तटस्थपणे तपासणी करणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत या गुणांकनाची पडताळणी होणार आहे.शिक्षकाचा अहवाल केंद्रप्रमुख घेतील केंद्रप्रमुखांचा अहवाल विस्तार अधिकारी पाहतील. विस्तार अधिकाऱ्यांचा अहवाल गटशिक्षणाधिकारी घेतील, तर गटशिक्षणाधिकाऱ्यांचा अहवाल शिक्षणाधिकारी घेणार आहेत. माध्यमिक शाळांतील शिक्षकांचा अहवाल संबंधित मुख्याध्यापक घेतील आणि मुख्यध्यापकांचा अहवाल शिक्षणाधिकारी घेणार आहेत. ही नवी मूल्यमापन पद्धती काही महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे.