शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना आटोक्यात आल्यानंतरच नव्या शैक्षणिक सत्राला होणार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 05:00 IST

शिक्षण विभागाने गतवर्षी १५ जूनला, तर विदर्भातील शाळा २६ जूनपासूनच शैक्षणिक वर्ष सुरू केले होते. शाळा बंदच ठेवून ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला. इयत्ता पहिली ते अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या असून, सरसकट सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्यात आली. आता शाळांना १ मेपासून उन्हाळी सुटी लागली आहे. १४ जून तर विदर्भातील शाळा २८ जूनपासून सन २०२१-२२ चे नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबतची घोषणा शिक्षण विभागाने केली आहे.

ठळक मुद्देतिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचे धोरण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत मुले संक्रमित होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याशिवाय नवीन शैक्षणिक वर्षात घाईघाईने शाळा सुरू करण्यात येणार नसल्याची माहिती प्राथमिक शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.शिक्षण विभागाने गतवर्षी १५ जूनला, तर विदर्भातील शाळा २६ जूनपासूनच शैक्षणिक वर्ष सुरू केले होते. शाळा बंदच ठेवून ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला. इयत्ता पहिली ते अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या असून, सरसकट सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्यात आली. आता शाळांना १ मेपासून उन्हाळी सुटी लागली आहे. १४ जून तर विदर्भातील शाळा २८ जूनपासून सन २०२१-२२ चे नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबतची घोषणा शिक्षण विभागाने केली आहे. शैक्षणिक वर्ष जरी सुरू झाले तरी लगेच शाळा सुरू करण्यात येणार नाहीत. कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत लहान बालकांना संसर्ग झाल्याचे बऱ्याच ठिकाणी आढळून आले, तर तुलनेने पहिल्या लाटेत हे प्रमाण जवळपास नव्हतेच. आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत शाळकरी बालकांना अधिक आहे. धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने पालकांची चिंता वाढू लागली आहे. तसेच कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर मुलांना शाळेत पाठविणार असल्याची भूमिका पालकांनी सतत स्पष्ट केली आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षण समितीने शासन व प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.  

आरोग्य सुविधेला महत्त्वआरोग्य सुरक्षेला अधिक महत्त्व देण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट ओसरल्यानंतरच प्रत्यक्ष शाळा सुरू होतील. विद्यार्थ्यांना घरात राहूनच शिक्षण घेता यावे, यासाठीच विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. पाठ्यपुस्तके सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात येणार आहेत. विद्या प्राधिकरणाकडूनही विविध माध्यमांतून ऑनलाईन शिक्षण देण्याच्या दृष्टीने विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या