शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

नवीन ५५ महाविद्यालयांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:23 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांमध्ये नवीन ५५ महाविद्यालये निर्मितीचा प्रस्ताव आहे. त्याअनुषंगाने कृती आराखडा तयार केला असून, बृहत आराखड्यात ही बाब नमूद केली आहे. सार्वत्रिक विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देकृती आराखडा : सार्वत्रिक विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांमध्ये नवीन ५५ महाविद्यालये निर्मितीचा प्रस्ताव आहे. त्याअनुषंगाने कृती आराखडा तयार केला असून, बृहत आराखड्यात ही बाब नमूद केली आहे. सार्वत्रिक विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.महाराष्ट्र सार्वत्रिक विद्यापीठ कायदा २०१६ लागू झाला. यानुसार कामकाज चालणे अपेक्षित आहे. त्यानुसार कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठाचा बृहत आराखडा तयार केला असून, शासनाकडे मान्यतेसाठी पाठविले आहे. हा आराखडा विद्यार्थी केंद्रित तयार केला आहे. त्याअनुषंगाने अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांमध्ये सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात नव्याने ५५ महाविद्यालये निर्मितीचा प्रस्ताव आहे. संस्था चालकांकडून महाविद्यालये निर्मितीसाठी २८ प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी १६ प्रस्तावाची छाननी करून ते मंजुरीसाठी शासनाकडे पाठविले. नवीन महाविद्यालये निर्मितीसाठी गावनिहाय लोकसंख्येचा आधार घेण्यात आला.विद्यापीठात दोन नव्या विभागाला मान्यताअमरावती विद्यापीठात नव्याने दोन विभाग निर्मित केले जाणार आहे. या विभागाला शासनाने मान्यता प्रदान केली आहे. या विभागाकरिता आवश्यक मनुष्यबळालाही मान्यता मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थी केंद्रीत अभ्यासक्रम या विभागात सुरू केले जातील, असे संकेत आहे.पाचही जिल्ह्यांतून शैक्षणिक संस्थाचालकांकडून २८ प्रस्ताव प्राप्त झालेत. त्यानुसार अर्जाची छाननी करून १६ प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविले आहे. शासनाची मंजुरी मिळताच महाविद्यालयांची नव्याने निर्मिती केली जाणार आहे.- राजेश जयपूरकर,प्र-कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.