शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

निव्वळ चर्चा; इडीचे पथक अंजनगावात पोहोचलेच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:17 IST

अंजनगाव सुर्जी (अमरावती) : राज्याचे माजी गृहमंत्री यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ‘ईडी’ कडून चौकशी केली जात आहे. त्यासंबंधाने अंजनगाव ...

अंजनगाव सुर्जी (अमरावती) : राज्याचे माजी गृहमंत्री यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ‘ईडी’ कडून चौकशी केली जात आहे. त्यासंबंधाने अंजनगाव सुर्जी येथील अवसायनात निघालेल्या अंबादेवी साखर कारखान्यावर इडीने धाड टाकल्याचे वृत्त मंगळवारी चांगलेच व्हायरल झाले अन्‌ अनेकांची पावले भंगारमय झालेल्या या कारखान्याकडे वळली. अनेकांनी आपली सूत्रे हलवली. जुने ‘सोर्स’ वापरले. मात्र, कुणीही इडीच्या धाडीला दुजोरा दिला नाही. तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनीदेखील कुणीही आले नाही, असे ठामपणे सांगितल्याने अनेकांची स्थिती ‘खोदा पहाड निकला चूहा’ अशी झाली. ईडीचे पथक अंजनगावात पोहोचलेच नाही.

अंबादेवी साखर कारखान्याच्या चौकशीकरिता ईडीचे अधिकारी येणार, या चर्चेला एकच उधाण आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. सहकार क्षेत्रदेखील ढवळून निघाले. या कारखान्याशी संबंधित एका सहकार नेत्यालादेखील संपर्क करण्यात आला. त्यांनी अनभिज्ञता दर्शविली. तरीही अनेकांनी साखर कारखानास्थळी धाव घेतली. अधिकारी थोड्या वेळाने येतील म्हणून वाट पाहत थांबले. परंतु, सायंकाळपर्यंत कुणीही साखर कारखान्यात फिरकले नाही. अनेकांना साखर कारखान्याची भव्य वास्तू आणि १०५ एकरात पसरलेले जंगल मात्र न्याहाळता आले.