शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पृष्ठांच्या डब्यापासून साकारली चिमण्यांसाठी घरटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 22:28 IST

कचऱ्याच्या स्वरुपात घरात पडून असलेल्या पृष्ठांच्या डब्यापासून चिमण्यांसाठी घरटे साकारण्याचे काम हेल्प फाऊन्डेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु केले.

ठळक मुद्देहेल्प फाऊंडेशनचा उपक्रम : निसर्ग संवर्धनासाठी पाऊल

आॅनलाईन लोकमतअमरावती : कचऱ्याच्या स्वरुपात घरात पडून असलेल्या पृष्ठांच्या डब्यापासून चिमण्यांसाठी घरटे साकारण्याचे काम हेल्प फाऊन्डेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु केले. त्याच्या या कार्यातून चिमण्यांना हक्काचे घरटे मिळाले असून या निसर्ग संवर्धनाचा उद्देश ठेऊन निशुल्क हे घरटे वितरीत केले जात आहे.हल्ली चिमण्यांचा चिवचिवाट कमी झाला आहे. वाढत्या सिमेंटीकरणामुळे चिमण्यांना घरटे करण्यासाठी जागाच उरली नसल्याचे चित्र आहे. पूर्वी कुडाची व कौलांच्या घरात चिमण्या घरटे करून राहात होत्या. मात्र, आता ती स्थिती नसल्यामुळे चिमण्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. मात्र, या पक्षांना शहरी भागात अधिवास मिळावा, यासाठी काही निसर्गप्रेमी सातत्याने कार्य करीत आहे. हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष रत्नदीप वानखडे, विक्की गावंडे, शुभम गायकवाड, अक्षय होले, कौस्तुभ गाडे, श्रीकांत गावंडे, सुमेध गवई, पवन देशमुख यांनी चिमण्यांसाठी हक्काची घरटे तयारी केली आहेत. घरात पडून असलेल्या पृष्ठाच्या डब्याचे घरटे त्यांनी तयार केले आहेत. साध्या पृष्टाच्या डब्यांचा वापर करून चिमण्यांसाठी घरटे तयार केली आहे. ती घरटे निशुल्क वाटण्याचे काम संस्थेचे पदाधिकारी करीत आहे.निसर्ग संरक्षणासाठी प्रत्येकाने थोडेफार योगदान दिल्यास निसर्गाचा समतोल टिकून राहील, अन्यथा सर्वानाच दुष्पपरिणामाला सामोरे जावे लागेल. चिमण्यांचे कृत्रिम घरटे तयार करून निसर्ग संवर्धनास हातभार लावणे आता गरजेचे आहे.- रत्नदीप वानखडे,अध्यक्ष, हेल्प फाऊन्डेशन