शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंतांच्या वाहनाकडे दुर्लक्ष, गरिबाच्या रिक्षाकडे गेले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2016 00:19 IST

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे हा पोलिसांच्या कर्तव्यांचा भाग आहे.

पोलीस कारवाईचा दुजाभाव : वृध्दाने उधार पैसे घेऊन भरले न्यायालयात अमरावती : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे हा पोलिसांच्या कर्तव्यांचा भाग आहे. मात्र, कारवाई करताना श्रीमंतांच्या वाहनांकडे दुर्लक्ष करून गरिबांवर तत्काळ कारवाई केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशीच एक कारवाई शहर कोतवाली पोलिसांनी केली. एका वृध्द रिक्षा चालकाला १०० रुपयांचा दंड ठोठावला. त्या वृध्दाजवळ पैसे नसताना त्याने दुसऱ्याजवळून पैसे घेऊन न्यायालयात भरले. ही कारवाई समर्थनीयच आहे; तथापि अनेक चारचाकी आणि दुचाकीचालक नियमांचे खुलेआम उल्लंघन करीत असूनही त्याच्याकडे डोळेझाक केली जाते, हे वेदनादायी आहे. कायदा हा सर्वासाठी सारखाच आहे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे, ही बाब सुध्दा महत्त्वाची आहे. तेव्हाच वाहतूक नियमांविषयी जनजागृती व नियम पाळण्याची सवय अमरावतीकरांना लागू शकते. मात्र, शहरातील बहुतांश मार्गावर चारचाकी महागडी वाहने सर्रास उभी राहतात. नोपार्किंगमध्येही श्रीमंतांची वाहने उभी केली जातात. अशी अनेक उदाहरणे शहरातील विविध ठिकाणी पाहायला मिळते. मात्र, मोठ्या वाहनावरील कारवाईचा आलेख हा कमी असल्याचेच आढळून आले आहे. त्यातुलनेत सर्वाधिक कारवाईचा बडगा दुचाकीस्वारांना सहन करावा लागत आहे. अशाच दुजाभावाचा प्रकार शुक्रवारी शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला. जयस्तंभ चौकात वृध्द रिक्षाचालक सुरेश दामोधर गोसावी (५७,रा. मांगीलाल प्लॉट) याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्यांना १०० रुपयांचा दंड ठोठावला. त्या रिक्षा चालकाजवळ दंडाची रक्कम भरण्यासाठीही पैसे नव्हते, त्यामुळे त्यांने एका अनोळखी युवकाजवळून घेऊन दंडाची रक्कम न्यायालयात जाऊन भरूनसुध्दा दिली. वाहतूक नियंत्रणाकडे पोलिसांचे लक्ष असल्याचेही सिद्ध होते. मात्र, शहरात असे शेकडो वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस पुढे येत नाही, असा प्रश्न या े उपस्थित झाला आहे. एका गरिब रिक्षावाल्याने वाहतूक नियम पाळला नाही, तो अज्ञानी असल्यामुळे त्यांच्या ती बाब लक्षात आली नसावी, मात्र, सज्ञान श्रीमंत नियमांचे ज्ञान असतानाही वाहतूक नियम तोडत आहेत, मात्र, तरीसुध्दा पोलीस त्याच्यावर कारवाईस दुर्लक्ष का करतात, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. (प्रतिनिधी)